![Shani Shingnapur Temple : भाविकांना ब्रँण्डेड तेलानेच करावा लागणार तैलाभिषेक; शनैश्वर देवस्थानचा निर्णय Shani Shingnapur Temple : भाविकांना ब्रँण्डेड तेलानेच करावा लागणार तैलाभिषेक; शनैश्वर देवस्थानचा निर्णय](https://c.ndtvimg.com/2025-02/4rahoofg_shani-shinganapur-temple_625x300_15_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
राहुल कुलकर्णी, पुणे
शनिशिंगणापूरमध्ये येत्या 1 मार्चपासून सुट्या तेलाना शिळेवर अभिषेक करता येणार नाही. शिळेचा अभिषेक करण्यासाठी भाविकांना ब्रँडेड तेलानेच करावा लागणार आहे. भेसळीच्या तेलाने शिळेची झीज असल्याचं निदर्शनास आल्याने ती रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी एक मार्चपासून चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आला.
(नक्की वाचा- Love Jihad Law : राज्यात 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करणार, विशेष समितीची स्थापना)
शनिशिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
(नक्की वाचा- Political News : "मला हलक्यात घेऊ नका", एकनाथ शिंदेंचा इशारा कुणाला? राजकीय चर्चांना उधाण)
अप्रमाणित तेलात पॅराथिनचे अंश
प्रमाणित खाद्यतेलात केमिकलचा अंश नसल्याने ते वापरास, खाण्यासाठी चांगले असते. त्याचे साइड इफेक्ट होत नाहीत. मानके प्रमाणित नसलेल्या तेलात पॅराथिनसारखे केमिकलचे अंश असतात. त्यामुळे तेलाचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे देवस्थानने हा निर्णय घेतला, असे अहिल्यानगरचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world