![Political News : "मला हलक्यात घेऊ नका", एकनाथ शिंदेंचा इशारा कुणाला? राजकीय चर्चांना उधाण Political News : "मला हलक्यात घेऊ नका", एकनाथ शिंदेंचा इशारा कुणाला? राजकीय चर्चांना उधाण](https://c.ndtvimg.com/2024-11/likk3kbg_cm-eknath-shinde_650x400_23_November_24.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
प्रांजल कुलकर्णी, नाशिक
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. कॅबिनेट असेल किंवा इतर महत्त्वाच्या निर्णयामध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी नसल्याचे बघायला मिळतंय. दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमागची कारणं जरी वेगवेगळी असली तरी मात्र त्यानंतर कालच नाशिकमध्ये पार पडलेल्या आभार दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलतांना म्हटलं की, मी शब्द देणारा आणि शब्द पाळणारा आहे. 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मे अपनी खुद की भी नही सूनता", अशी डायलॉगबाजी केली. मी साधा कार्यकर्ता आहे पण बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. मला हलक्यात घेऊ नका, मला हलक्यात घेतल्याने काय झाले हे माहितीच आहे, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. मात्र एकनाथ शिंदे यांनी हा इशारा नक्की कुणाला दिला? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)
उद्धव ठाकरेंवरीही निशाणा
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटलं की, "जहा पे हम खडे होते है, वहासे लाईन शूरु होती है. तुम्हाला तुमचे लोक का सोडून जात आहेत याचा विचार करा. लाथ मारू तिथं पाणी काढू अशी ताकद आपल्या शिवसेनेत आहे. आपली ताकद वाढते आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्याकडे येत आहेत. मी एक निमित्त आहे. हा पक्ष मालक आणि मुलाचा नाही, कार्यकर्त्यांचा आहे. राजा का बेटा राजा नही बनेगा."
जेव्हा कार्यकर्ता संकटात असतो तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला पाहिजे. महापालिकेला मेहनत करायची आहे आणि विधानसभेप्रमाणे महापालिकेतही यश मिळवायचे आहे, यांना घरी बसवायचे आहे. फेसबुक लाईव्ह करून काही होतं का? फेस टू फेस लोकांशी संवाद साधून समस्या सोडव्याव लागतात, असा टोलानी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
(नक्की वाचा- रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का?)
सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांवर टीका करत आहेत. EVM वर संशय घेतायत. पण तुमची जागा जनतेने तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही आत्मचिंतन करा, लोक तुम्हाला का सोडून जातात विचार करा. आगामी महापालिका निवडणुकीतही आपल्याला स्वच्छता मोहीम राबवायची आहे, असा सूचना देखील एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांना केल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world