कराड: राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या अनपेक्षित निकालाने अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे. राज्यात महायुतीने तब्बल २३० जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. दुसरीकडे त्याच दिवशी लागलेल्या झारखंड विधानसभेत मात्र इंडिया आघाडीने बाजी मारली. या दोन्ही राज्याच्या निकालावरुन शरद पवार यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
'विधानसभेच्या निकालामध्ये आणखी एक अँगल लोक सांगतात. चार महिन्यांपूर्वी एक निवडणूक झाली. जम्मू- काश्मिर आणि हरियाणा. त्यात जम्मू काश्मीरमध्ये भाजप विरोधकांना यश आले. तर हरियाणाची निवडणूक मात्र भाजपकडे गेली. त्यानंतर आता दुसरी निवडणूक झाली. महाराष्ट्राची निवडणूक ठरलेल्या महिन्यापेक्षा उशिरा झाली. ती झारखंडसोबत झाली.
नक्की वाचा: शरद पवारांचं राजकारण संपलं! विरोधकांना एका वाक्यात उत्तर; पुन्हा मोठी गर्जना
'झारखंडमध्ये काँग्रेसला यश आहे, इथे अपयश आहे. त्यामुळे एक लहान राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या कामासाठी असा काही गमतीचा चेंज दिसतो. उद्या कोणी मशिनचा आरोप करायला नको. त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना, तेव्हा हीच मशिन होती, असं ते म्हणाले. शरद पवार यांच्या या विधानावरुन त्यांनी थेट ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, निकाल लागल्यावर 'एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असे वाटले नव्हते. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील, 'असे म्हणत शरद पवार यांनी पुन्हा मैदानात उतरुण काम करणार...' असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
महत्वाची बातमी: मनसेमुळे उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! 10 जागांवर उडाला असता धुरळा; वाचा 'राज'कारण