मंगेश जोशी, जळगाव
चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने भर सभेत गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चाळीसगावमध्ये राज्य सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष किसन जोरवेकर यांनी "माझ्या नादी लागल्यास पिस्तूल आणून रस्त्यावर गोळ्या झाडेन" अशी जाहीर धमकी दिली.
(नक्की वाचा- महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर दबाव, पवारांसमोरील पर्याय काय?)
नेमकं काय म्हणाले जोरवेकर?
किसन जोरवेकर यांनी म्हटलं की, "या तालुक्यात जी गुंडगिरी सुरु झाली याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहिती आहेत. मला देखील दमबाजी करण्यात आली होती. मलाही संपवण्याची धमकी दिली होती. पण मात्र वय 73 वर्ष आहे. मला कॅन्सर झालाय, मधुमेह झालाय. त्यामुळे माझ्या नादी लागाल तर पिस्तुल आणेल आणि गोळ्या घालून टाकेन. मला काय जास्त जगायचं नाही. मला चार वेळा जीवदान मिळालेलं आहे."
(नक्की वाचा- भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?)
जोरवेरकर बोलत असताना स्टेजवरील अनेक पदाधिकारी यांनी देखील हसत, टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली. त्यामुळे जोरवेकर यांच्या वक्तव्याची दखल पोलीस प्रशासनाकडून घेऊन काही कारवाई केली जाते का? हे पाहावं लागेल.