बंडोबांना थंड करण्यासाठी शरद पवार मैदानात, आज गुप्त बैठका घेणार

बंडोबांना थंड करण्यासाठी शरद पवार आज इंदापूरात येणार असून नाराज नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

इंदापूरचे (Indapur VidhanSabha Election) महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) विजयासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. इंदापूरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन नाराज झालेल्या काही नेत्यांसोबत शरद पवार आज गुप्त बैठका घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. पवार गटातील भरत शहा, आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रवीण माने यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. विशेष म्हणजे प्रविण माने यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे. त्यामुळे पवार आज कोणाकोणाला भेटणार आणि हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग सुखर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

इंदापूर मतदारसंघावरुन महायुतीत मोठी खलबतं सुरू होती. अजित पवारांनी या भागातून जनसन्माम यात्रा घेतली होती, दादांचा गट या भागात सक्रिय झाला होता. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी नाराज झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी महिनाभरापूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून तिकीट जाहीर करण्यात आलं. मात्र यानंतर शरद पवार गटातील इंदापूरातील इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत.

मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला यशस्वी होणार का? तज्ज्ञांना काय वाटतं?

नक्की वाचा - मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला यशस्वी होणार का? तज्ज्ञांना काय वाटतं?

पवार गटातील भरत शहा, आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रवीण माने यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. विशेष म्हणजे प्रविण माने यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे. त्यांना अर्ज मागे घेण्यास मनधरणी करण्यासाठी आता थेट शरद पवार मैदानात उतरले आहेत.  बंडोबांना थंड करण्यासाठी शरद पवार आज इंदापूरात येणार असून नाराज नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती आहे. 

Advertisement