शरद पवार आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार?

मागच्या आठवड्यात छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीत शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

शरद पवार (Sharad Pawar meet CM Eknath Shinde) आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. दुधाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार बैठकांची होत आहे. या बैठकीला शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित नवले देखील असतील. राज्यात सध्या मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे प्रश्न देखील गंभीर आहेत. यासंदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मागच्या आठवड्यात छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीत शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण बिघडलं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वरिष्ठ नेत्याने मध्यस्थी करावी, अशी मागणी छगन भुजबळांनी केली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांनी कोणत्या गोष्टींचं वचन दिलं होतं, याबाबत माहिती देणं आवश्यक असल्याचं पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज तीन वाजता शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.  

नक्की वाचा - मनोज जरांगे-लक्ष्मण हाके सोमवारी आमनेसामने येण्याची शक्यता; पोलिसांसह अंतरवालीवासीय टेन्शनमध्ये

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून 'ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रे'ला सुरुवात होत आहे. अंतरवाली सराटीपासून जवळ असलेल्या मंडल स्तंभापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे ही यात्रा अंतरवाली सराटीमधून जाणार आहे. तर याच अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. 

Advertisement