जाहिरात

शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू, भाच्यानेही गमावला जीव; रायगडावर शोककळा

या घटनेमुळे गावातील वातावरण शोकाकूल झालं आहे.  

शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू, भाच्यानेही गमावला जीव; रायगडावर शोककळा

Santosh Patil : शेतकरी कामगार पक्षाचे म्हळसा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दोन्ही मुलांवर काळाचा घाला घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा सुट्टीसाठी ऐरोलीहून रायगडला गावी आला होता. त्याला आणि आपल्या दोन्ही मुलांना घेऊन संतोष पाटील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यावेळी तिघांनीही पोहोण्याची इच्छा व्यक्त केली. ते खोल समुद्रात उतरले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Solapur News : सोलापुरचे विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. वळसंगकर कशामुळे होते तणावात? आत्महत्येचं धक्कादायक कारण

नक्की वाचा - Solapur News : सोलापुरचे विख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. वळसंगकर कशामुळे होते तणावात? आत्महत्येचं धक्कादायक कारण

यामध्ये संतोष पाटील यांची दोन्ही मुलं मयुरेश संतोष पाटील (23), अवधुत संतोष पाटील (26) आणि हिमांशू पाटील (21) या बहिणीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हिमान्शू नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहत होता. तो सुट्टीसाठी मामाच्या गावी आला होता. मात्र येथे तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातील वातावरण शोकाकूल झालं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: