
अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती. त्यात 51 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आले होते. त्यातील 10 भिक्षेकर्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे भलताच प्रकार झाल्याचा आरोप भिक्षेकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
51 भिक्षेकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून संयुक्त मोहिमे अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. त्यातल्या 10 जणांची तब्बेत बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यातल्या चार जणांचा अचानक मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. या भिक्षेकरांना एका रूममध्ये बांधून ठेवण्यात आले होते. त्या रूमला टाळे ठोकण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
या शिवाय या भिक्षेकरी रुग्णांना साधं पाणी देखील देण्यात आलं नव्हतं. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू नसल्याचा आरोप ही यावेळी नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय नातेवाईक हे आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसण्याची भूमिका नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे रुग्णालया बाहेर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray: लोकसभेत राज ठाकरेंचा विषय, हिंदी भाषिक खासदार आक्रमक, वाद पेटणार?
याबाबत आता रुग्णालय प्रशासनाने ही आपली बाजू मांडली आहे. ज्या भिक्षेकरींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यातील पेशंट हे अल्कोहोलिक होते असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्यावर उपचार करताना ते त्रास देत होते. त्यांच्यावर उपचार करता यावेत यासाठी त्यांना बांधून ठेवण्यात आल्याचा दावा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस. चव्हाण यांनी केला आहे. हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. शिवाय जो काही मृत्यू झाला आहे तो गूढ असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world