जाहिरात
Story ProgressBack

'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

Read Time: 3 mins
'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मुंबई:

अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra State Budget 2024-25) विधानसभेत सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. महिला, शेतकरी, तरुण वर्गासह निरनिराळ्या घटकांना खूश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आलाय. अजित पवारांनी सादर केलेल्या या बजेटवर विरोधकांनी टीका केलीय. हा अर्थसंकल्प म्हणजे खोटा नरेटिव्ह आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्व सोडलं का? असा प्रश्न देखील त्यांनी बजेटमधील एका तरतूदीवर बोलताना विचारला आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले ठाकरे?

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आश्वासनांना कंटाळून त्यांना दणका दिला आहे.महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे.कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही. महाराष्ट्र गुजरातच्या मागं गेला आहे. धुळफेक करायची, रेटून बोलायचं, आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. हा अर्थसंकल्प खोटा नरेटिव्ह आहे, अशी टीका ठाकरे यांनी केला. 

आर्थिक तरतूदीसंदर्भात काहीही बोलले नाहीत. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी. राज्य सरकारनं या अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' योजना सादर केली आहे.ही योजना म्हणजे महिलांना आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.माता भगिनींना देत असाल तर जरुर द्या पण  मुलगा आणि मुलगी असा भेद करु नका, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2024 मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा )

बेजोरगारासंदर्भात कुठेही उपाययोजना नाहीत. शेतकऱ्यांना वीज बील माफ करा ही मागणी मान्य केली  मात्र कर्जमाफी बाबत अजूनही बोलले नाहीत.विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहे यासंदर्भात सगळे वाट बघत आहेत. हे लबाडाचे औताण आहे. हा अर्थसंकल्प आहे की जुमला संकल्प असा प्रश्न विचारत जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा निवडून देईल, असं वाटत नाही, असा दावाही ठाकरे यांनी केला.  

हिंदुत्व सोडलं का?

विठूरायाच्या वारकऱ्यांना देखील विकत घेण्याचा प्रयत्न होतोय. अशांना तुम्ही पैशांचा लोभ दाखवू शकत नाही. मौलाना आझाद योजनेची तरतूद वाढवली, मग यांनी हिंदूत्व सोडलं का? असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. शेतकरी आत्महत्येबाबत काही तरतूद नाही. आपत्कालीन मदत अद्याप पोहोचलेली नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय देणार आहात ? पिक आल्यानंतर हमीभावाचं काय? असा प्रश्न विचारत  
महाराष्ट्र लुटला जातोय,यांना पुन्हा निवडून देणार नाही. आमचं नेटवर्क दणकट आहे, यांना निवडणुकीत हिसका दाखवू, असं ठाकरे यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2024 : दुधाचे दर कमी होणार? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती

जुमल्याचा अर्थसंकल्प

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या बजेटवर टीका केली. राज्यातल्या जनतेची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे आम्ही पोस्टमार्टेम सोमवारपासून करणार आहोत. जुमल्यांचा अर्थसंकल्प असे याला म्हणावे लागेल, अशी टीका पटोले यांनी केली. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भाजपचं ठरलं? विधान परिषदेसाठी 'या' नेत्यांना मिळणार संधी
'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Maharashtra budget 2025 cm eknath-shinde-reply-uddhav-thackeray-criticism-of-mukhyanantri-majhi-ladki-bahin-yojana
Next Article
Maharashtra Budget 2024 'त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा...'मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना उत्तर
;