जाहिरात
This Article is From Jul 08, 2024

'दिसशील तिथे गोळ्या घालीन', शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Solpaur News : धमकीनंतर शरद कोळी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.  शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत.

'दिसशील तिथे गोळ्या घालीन', शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

सौरभ वाघमारे, सोलापूर

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'मागील वेळी तू वाचला होता. आता जिथे दिसशील तेथे बंदुकीच्या गोळ्या घालीन,' अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना वाळू माफियाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धमकीनंतर शरद कोळी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.  शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत.

कुणी आणि का दिली धमकी?

सोलापुरातील वाळूमाफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली आहे. चार दिवसापूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते.  त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली.

नक्की वाचा - राष्ट्रवादी अजित पवार गटाला गोंदियात खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

याशिवाय पिंटू पाटील यांने सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय देखील जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलीस पुढीत तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: