जाहिरात

धग धगता कडवट शिवसैनिक! दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे निधन

धग धगता कडवट शिवसैनिक! दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pandurang Sakpal: ठाकरे गटाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी (25 मे 2024) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. संध्याकाळी 5 वाजता गिरगावातील चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

"पांडुरंग सकपाळ... धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला. अनेक आंदोलनात पोलिसांचा मार खाल्ला. तुरुंग भोगला.पण पांडुरंग मागे हटला नाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता. असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला. विनम्र  श्रद्धांजली", अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पांडुरंग सकपाळ यांना 'X' वर पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

पांडुरंग सकपाळ यांची राजकीय कारर्कीद 

- दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यास पांडुरंग सकपाळ यांचा मोठा हातभार होता. 

- जवळपास बारा वर्षांपासून सकपाळ ठाकरे गटाचे विभाग प्रमुख कार्य करत होते.

- शिवसेना पक्षामधील गटबाजीनंतरही दक्षिण मुंबईमध्ये पांडुरंग सपकाळ यांनी गड एकहाती राखला होता. 

- शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. 

- बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग सकपाळ यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड करण्यात आली.

- विभागप्रमुख पद काढून घेतल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांचा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग दिसत नव्हता. 

- दक्षिण मुंबईतील आंदोलनाचा आक्रमक चेहरा म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख होती.

Maharashtra Election | राज्यात लोकसभेची रणधुमाळी शांत, ठाकरेंचे २ शिलेदार परिषदेच्या रिंगणात

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
जरांगेना आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा नाही, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! मराठा आमदाराचा हल्लाबोल
धग धगता कडवट शिवसैनिक! दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Sharad Pawar give the big reason why central government gave Z plus security
Next Article
केंद्र सरकारने सुरक्षा का पुरवली? शरद पवारांनी दिली मोठी माहिती