शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Shiv Sena UBT-MNS Alliance For BMC Elections 2026) या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आघाडी कशी करायची, यासंदर्भात सातत्याने बैठका घेतल्या होत्या. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिकसह 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. (BMC Election Voting And Counting Date) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी या निवडणुकांसाठी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईसह कोणकोणत्या महापालिकांसाठी ही युती असेल हे दोघे संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहेत.
नक्की वाचा: Pune PMC Elections 2026: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, मुहुर्तही ठरला; राजकारणाचे वारे फिरणार
जागा वाटपही पूर्ण झाले?
शिवसेना(उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे 'उद्या 12 वाजता' संजय राऊत यांनीच दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, युतीची घोषणा दोन दिवसांत होईल. दोन्ही पक्षांची चर्चा झाली असून जागावाटपही झाले असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. कोणी कुठे लढायचे यावर एकमत झाले असून , कोणतीही अडचण दिसत नाही असे राऊत यांनी म्हटले होते.
उद्या
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG
नक्की वाचा: महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र
वरळीतील NSCI डोममध्ये होणार पत्रकार परिषद
बुधवारी होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. वरळीतील NSCI डोममध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. युतीच्या घोषणेसोबत मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये कोण किती जागा लढेल याबाबतची माहिती मिळणार का ? याचीही उत्सुकता आहे. शिवसेना (उबाठा) आणि मनसेमध्ये काही जागांवरून पेच निर्माण झाला होता. हा पेच ठाकरे बंधू एकत्र बसून सोडवतील असे सांगितले जात होते. हा पेच सुटला आहे की नाही, हे बुधवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world