
योगेश शिरसाठ, अकोला
शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला करणारे अकोल्यातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवलं. त्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादानंतर त्याच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पृथ्वी देशमुखला मारहाण करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- 'मुख्यमंत्रिपदासाठी कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे सुरु', CM शिंदेंची ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका)
पाहा VIDEO
आमदार नितीन देशमुखे यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले. नितीन देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे समजते.
(नक्की वाचा- 'अमित शहा नाही तर हे अहमद शाह अब्दाली', ठाकरे थेट भिडले)
तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. "सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत आहेत. पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत. आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे, असंही आमदार नितीन देशमुख म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world