Reelstar Prem Bhati Death: कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याणमधील मोहनी परिसरात दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसिद्ध रीलस्टार प्रेम भाटी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मीडिया जगतात शोककळा पसरली आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत असून स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
VIDEO: 'मी त्याला थांबवायला हवं होतं, पण...' 370 रुपयांची बिर्याणी' वादावर प्रणित मोरेने मौन सोडलं
कल्याणमध्ये दुर्दैवी अपघात, प्रसिद्ध रिलस्टारचा मृत्यू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याणमध्ये एका दुर्दैवी अपघातात सुप्रसिद्ध रिलस्टर, प्रेम भाटी यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मोहनी परिसरात घरी जात असताना हा अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांची गाडी घसरली आणि ते खाली पडले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रेम भाटी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होता. त्याचे इंन्स्टाग्रामवर तब्बल ८३ हजार फॉलॉअर्स आहेत तर युट्यूबवर तीन मिलियन सबक्रायबर्स आहेत. प्रेम भाटी कॉमेडी, हॉरर अशा प्रकारचे रिल्स सोशल मीडियावर शेअर करत होता. या घटनेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world