Titwala Accident News Today : कल्याण जवळील टिटवाळा ग्रामीण भागातील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. पिण्याचे पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन मुलांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतरच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी चालक अमन सानाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
हा अपघात शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास टिटवाळा पूर्व येथील इंदिरा नगर ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. तीन अल्पवयीन मुलं गॅलनमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी एका ठिकाणी गेले होते. मात्र त्या ठिकाण त्यांना पाणी मिळाले नाही. हे तिन्ही मुलं घरी परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग! शहराजवळील 'या' 11 ठिकाणी धो धो बरसला, रस्त्यांवरही साचलं पाणी, VIDEO
जखमी मुलांना खसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गाळ्यात घुसली. या अपघातात गाळ्याचे तसेच तेथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी चालक अमन सानप विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
नक्की वाचा >> Siya Goyal News : केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने काय काय केलं? संपूर्ण Google हिस्ट्री आली समोर
या घटनेमुळे टिटवाळा ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, नियमित पाणीपुरवठा असता तर या चिमुकल्यांना पाणी आणण्यासाठी रस्त्यावर जावे लागले नसते.तसेच या मार्गावर भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर, इशारा फलक आणि अन्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world