Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात गेल्या 10 दिवसांत 5 महिला आणि तरुण मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. 22 ते 25 मार्च दरम्यान विविध गावांतील या महिला बेपत्ता झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून गेल्या दहा दिवसांत पाच महिला आणि तरुण मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एकामागोमाग एक घडणाऱ्या या प्रकारांमुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.

बेपत्ता महिलांची सविस्तर माहिती

  • 22 मार्च (बोरगाव): 35 वर्षीय तरुण महिला घरातून निघून गेली आणि अद्याप परतली नाही.
  • 23 मार्च (करमाळा शहर): 21 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदवली आहे.
  • 23 मार्च (मोरवड): 20 वर्षांची युवती अचानक बेपत्ता झाली असून तिचा शोध सुरू आहे.
  • 25 मार्च (पांगरे): 35 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
  • 25 मार्च (उमरड): 51 वर्षांची प्रौढ महिला घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: पनवेलच्या कामोठ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! मेडिकलमध्ये घुसून 'मनसे'ने उतरवला तरुणाचा माज)

केवळ 10 दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणांहून 5 स्त्रिया बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. करमाळा पोलिसांनी या सर्व घटनांची गंभीर दखल घेतली असून, संबंधित महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. जर कोणालाही या बेपत्ता महिला किंवा तरुणींबाबत काहीही माहिती मिळाल्यास, त्यांनी त्वरित करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

Advertisement

परिसरात भीती आणि संभ्रम

एकाच तालुक्यात इतक्या कमी वेळात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. "मुलींना एकटं बाहेर पाठवताना आता भीती वाटत आहे," अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामागे एखादी संघटित टोळी आहे की ही वैयक्तिक कारणे आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

(नक्की वाचा- Saamana Editorial : लॉकडाऊन होईल का? सामनातून राज्यातील सद्यस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा)

करमाळा पोलिसांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना आणि ग्रामसुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि चेक पोस्टवर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Topics mentioned in this article