Solapur Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भीषण अपघात झाला ज्यामध्ये तिघांना जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात मोठा अपघात
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सोलापुरा शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात तीन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत तिघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तिन्ही मुले त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.
Pune News: स्पेनमधून बेपत्ता झालेल्या कॅप्टन शरीफ भोसलेंवर होणार मोठी कारवाई
तीन तरुणांचा मृत्यू
नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. तीन तरुण मुलांना असा दुर्दैवी जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
दुसरीकडे, मुंबई गोवा महामार्गावर झाराप पेट्रोल पंपासमोर दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात मनीष पेडणेकर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले परंतु डोक्याला मार लागल्याने त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनीष पेडणेकर हा वेताळबांबर्डे येथील रहिवासी आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून कुडाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.
Malegaon News: फोटो पुन्हा लागणार, वादाचा भडका उडणार! उपमहापौर शान ए हिंद थेट बोलल्या...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world