Solapur News: टीव्ही आणि सोन्याच्या अंगठीची हाव, गरीबाच्या लेकीचा झळ, अन् 4 महिन्याच्या संसाराचा भयंकर शेवट

Solapur Crime News: सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे हुंड्यासाठी एका 22 वर्षीय विवाहितेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोहोळ तालुक्यातील सारोळे गावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका विवाहितेची तिच्या पती आणि सासूने गळा दाबून हत्या केली. सोनाली प्रतीक शिंदे असे या विवाहितेचे नाव आहे. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र पोस्टमार्टम (PM) अहवालाने या हत्येचा पर्दाफाश केला आहे.

केवळ 4 महिन्यांचा संसार 

सोनाली हिचा विवाह अवघ्या चार महिन्यांपूर्वी सारोळे येथील प्रतीक शिंदे याच्याशी झाला होता. मात्र, सुखी संसाराऐवजी तिच्या वाट्याला छळ आला. "लग्नात टीव्ही दिला नाही, सोन्याची अंगठी घातली नाही," असे म्हणून पती प्रतीक आणि सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांनी सोनालीचा छळ सुरू केला होता. सोनालीच्या आई-वडिलांनी आपली परिस्थिती गरीब असल्याचे सांगून वेळोवेळी समजूत काढली आणि 20 हजार रुपये देखील दिले होते. मात्र, आरोपींच्या पैशांची भूक शमली नाही.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat Case: खरातने चाकणकरांच्या बहिणीला कसं फसवलं? चौकशीत धक्कादायक माहिती उघड)

त्या रात्री काय घडलं?

12 एप्रिलला पती प्रतीकने सोनालीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, "आम्ही रात्री एकत्र झोपलो होतो, पण सोनाली सकाळी उठलीच नाही." सोनालीला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संशयावरून करण्यात आलेल्या पोस्टमार्टममध्ये सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: खरातच्या कार्यक्रमात गेले, हसत-हसत भाषणही ठोकलं; वरिष्ठ IPS अधिकारी गोत्यात? VIDEO समोर)

मोहोळ पोलिसांकडून आरोपींना बेड्या

सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे गुपित उघड होताच मोहोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती प्रतीक शिंदे, सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे या दोघांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 

Topics mentioned in this article