जाहिरात

Solapur Politics : 'दोन पाऊल मागे नाही, तर 50 फूट खाली..', मंत्री जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंना डिवचलं

प्रणिती शिंदे दो कदम पिछे नही हटे, 50 कदम निचे गिरे है और फिर गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका घेऊन काम करतात, अशी टीका त्यांनी केली आहे. 

Solapur Politics : 'दोन पाऊल मागे नाही, तर 50 फूट खाली..', मंत्री जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंना डिवचलं

सौरभ वाघमारे, सोलापूर:

Solapur Election Result 2026:  सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 87 जागांवर विजय मिळवला. तर एमआयएम 8 ,  शिवसेना शिंदे गट 4,  काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने एका जागेवर विजय मिळवला आहे.  सोलापूरमध्ये झालेला हा दारुण पराभव खासदार प्रणिती शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर प्रणिती शिंदे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. 

मंत्री जयकुमार गोरेंची प्रणिती शिंदेंवर टीका

सोलापूरच्या धक्कादायक निकालानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेयांनी सोमवारी एक भावनिक पत्र काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी लिहिले. या पत्रामध्ये त्यांनी " झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने.. असा संदेश दिला होता. यावरुनच पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे दो कदम पिछे नही हटे, 50 कदम निचे गिरे है और फिर गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका घेऊन काम करतात, अशी टीका त्यांनी केली आहे. 

Nashik Mayor : नाशिकचा महापौर कोण होणार? भाजपमध्ये मोठी स्पर्धा; थेट मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग

"प्रणिती शिंदे, गिरे तो भी टांग उपर अशी भूमिका असेल तर मी काय बोलणार. प्रणिती शिंदे खूप मोठ्या राजकारणी आहेत. दिल्लीच्या राजकारणात आहेत, राहुल गांधींच्या जवळच्या आहेत. तिथला अभ्यास चांगला आहे. दिल्लीत बसून शहराचे काम करतात, शहराच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. इतकी दूरदृष्टी लाभलेल्या नेत्या सोलापूरला लाभल्याचा आनंद आहे," असं जयकुमार गोरे म्हणाले.

प्रणिती शिदेंकडून सडेतोड उत्तर..

मंत्री जयकुमार गोरे यांच्या या टीकेला प्रणिती शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.  जयकुमार गोरे काय बोलतातत त्याकडे मी लक्ष देत नाही. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहलं होत, जयकुमार गोरे स्वतः काँग्रेसचे होते कदाचित त्यामुळे त्यांनी ते पत्र वाचलं असेल. पण ते संधीसाधू आहे त्यांना आमिष दाखवलं गेलं म्हणून ते भाजपत गेलेत,  त्यांची संस्कृती काय आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने निवडणूक लढवली हे यावरून कळते, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

नक्की वाचा - Nashik Election: एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन बंद! फक्त 1 जागा.. पराभवाचे कारण काय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com