जाहिरात

Solapur ZP Election 2026 : सोलापुरमध्ये भाजपची मोठी खेळी; उमेश पाटलांसह बंधू संतोष पाटील यांचाही पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा हा पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Solapur ZP Election 2026 : सोलापुरमध्ये भाजपची मोठी खेळी; उमेश पाटलांसह बंधू संतोष पाटील यांचाही पराभव

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Maharashtra ZP Election 2026 : मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कुरुल जिल्हा परिषद गटात भाजपच्या सचिन जाधव यांनी त्यांचा 1 हजार 303 मतांनी पराभव केला आहे. त्यांचे भाऊ संतोष पाटील यांचाही त्यांच्याच गावातून पराभव झाला आहे. मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवार सचिन जाधव यांनी त्यांचा 1 हजार 303 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. केवळ उमेश पाटील यांचाच नव्हे तर त्यांचे भाऊ संतोष पाटील यांचाही त्यांच्याच गाव नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे. पाटील कुटुंबासाठी ही निवडणूक मोठा धक्का ठरला आहे.

झालेला पराभव आम्ही मान्य करतो - उमेश पाटील

या निवडणुकीत राजन पाटील आणि उमेश पाटील यांचा राजकीय विरोध मोहोळ जनतेने प्रत्यक्ष पाहिला. राजकीय समीकरणे आणि विरोधी गट या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. भाजपला मिळालेले मोठे यश हे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. याबाबत उमेश पाटील म्हणाले, “झालेला पराभव आम्ही मान्य करतो. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. पण शेवटी पराभव हा पराभव असतो आणि तो आम्ही स्वीकारतो. ज्यांनी आम्हाला मतदान केले आणि ज्यांनी नाही केले, त्या सर्वांचे आभार. मात्र अनगरकरविरुद्धची आमची लढाई सुरूच राहणार आहे. आम्ही परत उभे राहू आणि लढू.”

नक्की वाचा - सोशल मीडियावर 'हिट', जनतेच्या दरबारात 'फ्लॉप'; कोण आहेत नेत्यांचे 'हे' पराभूत नातेवाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा हा पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला मोठ्या फरकाने विजय मिळाला याचा राजकीय अर्थ लावला जात आहे. मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून येत्या काळात येथील राजकारणात काय वळणे येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाध्यक्षांचा हा पराभव आणि पाटील कुटुंबाला बसलेला हा धक्का मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com