
सौरभ वाघमारे, सोलापूर
Solapur News : सोलापुरात गाडीचे हॉर्न जोरात का वाजवला या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. सोलापूरच्या घोंगडे वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकच्या मुलासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास सोलापुरातल्या घोंगडे वस्ती परिसरातील रऊफ इनामदार अनैतिक त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफ इनामदार यांच्यात बाचाबाची झाली.
(नक्की वाचा - Shivsena Protest: ठाकरे गट घेणार बँकांची शाळा; पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारणार)
या वादाचे रूपांतर आधी भांडणात झाले, त्यानंतर दोन्ही गटाचा सुमारे 300 हून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर आला. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बिपीन पाटील याच्यासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झालेत. तर परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
(नक्की वाचा- Palghar News: बियाणे खरेदी केलं, तरच खत देणार; कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक)
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आक्रमक भूमिकेत घटनास्थळी गर्दी केलेल्या तरुणांना पोलिसांनी पांगवले. रात्री उशिरा जखमीना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world