जाहिरात

Solapur News : प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्य

Solapur News : डॉ. शिरीष वळसंगकर केवळ सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे.  त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

Solapur News : प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्य

सौरभ वाघमारे, सोलापूर

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर झाडून घेत आत्महत्या केली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात कारणावरून डॉ. वळसंगकर डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ. वळसंगकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  मात्र अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  डॉ. शिरीष वळसंगकर हे  प्रसिद्ध न्युरोसर्जन होते.  केवळ सोलापूर, महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे.  त्यांनी टोकाचे पाऊले का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

( नक्की वाचा : Tanisha Bhise Case : दीनानाथ मंगेशकर नाही तर 'या' दोन हॉस्पिटलवर ससूनच्या अहवालात ठपका )

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांना स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

(नक्की वाचा- उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला, धक्कादायक कारण आलं समोर)

कोण आहेत डॉ. वळसंगकर?

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. त्याआधी डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी MBBS आणि MD पदव्या शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केल्या आहेत. तसेच, त्यांनी लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: