Beed Crime News : दारुच्या नशेपाई पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आपल्या आईशी वाद घालून दगडाने ठेचून तिचा खून केला. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चोत्राबाई सोन्नर असं मृत महिलेचे नाव आहे. तर अमृत भानुदास सोन्नर असं आरोपी मुलाचं नाव आहे. अमृतला दारुचं व्यसन होतं, यातून तो सतत घरच्यांना त्रास देत असे. अमृतच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून काही दिवसांपूर्वी त्यानी पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती.
(नक्की वाचा- VIDEO : लेकरासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवलं; भेदरलेल्या चिमुकल्याची आईला वाचवण्यासाठी धडपड)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री देखील असाच काहीसा प्रकार घडला. अमृत आणि चोत्राबाई हे दोघेच घरी होती. अमृतने आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र आईने दारू पिण्यासाठी अमृतला पैसे देण्यास नकार दिला. यातून संतापलेल्या अमृतने आईसोबत वाद घालायला सुरुवात केली.
(नक्की वाचा- Akola News: लग्नाची वरात थांबवून दगडांचा मारा, वऱ्हाडी रक्तबंबाळ; अकोल्यात राजकारण तापलं!)
या वादादरम्यान संतापलेल्या अमृतने आईला मारहाण करण्यास सुरुवात केला. रागाच्या भरात त्याने आईच्या अंगावर दगडांनी प्रहार केला. जबर मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अमृतला अटक केली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.