
Accident CCTV Footage : केरळच्या मल्लापुरम येथून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आपल्या मुलासोबत चाललेल्या महिलेला भरधाक कारने उडवलं. या धडकेच महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिडिओमधील दृश्यांनुसार, बुरखा घातलेली एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक पांढरी कार वेगाने येते आणि महिलेला धडकते आणि पुढे जाते. ही टक्कर इतकी जोरदार होती की ती महिला काही फूट उडाली आणि रस्त्यावर पडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. तर मुलगा थोडक्यात बचावला.
(नक्की वाचा- Akola News: लग्नाची वरात थांबवून दगडांचा मारा, वऱ्हाडी रक्तबंबाळ; अकोल्यात राजकारण तापलं!)
#Kerala: 26/04/2025 Tragic accident in Kottakkal (Swagathamdu) of Malappuram - A speeding car hit a woman "Badriya", leaving her seriously injured. Her son was also with her at the time of the accident, who remained safe. Badriya was admitted to MIMS hospital in Kottakkal. pic.twitter.com/cVc6cE6P5t
— Siraj Noorani (@sirajnoorani) May 1, 2025
अचानक घडलेला प्रकार पाहून लगानगा घाबरलेला दिसतोय. क्षणात तो जमिनीवर पडलेल्या आईकडे धावत जातो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही मदतीला धावले. लोकांना महिलेला रुग्णालयात दाखल केले. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world