एसटीच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट किंमतीत भाडेवाढाची प्रस्ताव दिला आहे. गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीटात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे.
नक्की वाचा - पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडर महागला, महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा झटका!
मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटीच्या या प्रस्तावावर शिक्कामोर्बत होईल. जर एसटी महामंडळाचे प्रस्ताव सरकारने मान्य केला तर 100 रुपयांच्या तिकीटामागे 15 रुपये अधिक मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्याने महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.
यापूर्वी 27 नोव्हेंबर 2021 रोजी तिकीट दरवाढ झाली होती. आता सुरुवातीच्या टप्प्यात 12.36 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या वाहतूक विभागाने शासनाकडे पाठवला होता. आता नवं सरकार स्थापन झाल्यानंतर काय निर्णय घेतला जातो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
नक्की वाचा - कॉलेजमधील मशीद आणि परिसरावर वक्फ बोर्डाचा दावा, वाराणसीत नवा वाद उफाळला
सध्याच्या तिकीट दरावर एसटी महामंडळाला खर्च भागवत नसल्याने ही भाव वाढ होत असल्याचे समजते आहे.लाल परीच्या दरवाढीवर प्रवाशांनी नाराजी दाखवली असून एकीकडे लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले जाते तर दुसरीकडून भाडेवाडीच्या रूपाने काढण्यात येतील अशा देखील प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिल्या आहेत.