ST Bus Accident : गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू
दीपेशकुमार टेंभरे, गोंदिया
एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटून झालेल्या अपघतात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. नागपूरहून गोंदियाकडे ही शिवशाही बस येत होती. घटनास्थळीृ बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या गोंदिया कोहमारा मार्गावर आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य महामंडळाची बस अपघातग्रस्त झाली. गोंदिया कोहमारा मार्गावरील ग्राम बिंद्रावन टोल परिसरात मुख्य मार्गावर हा अपघात झाला. शिवशाही बस क्रमांक एम. एच. 09 इ. एम. 1273 ही आहे. प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी किमान 10 ते 12 प्रवासांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात अन्य प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोणाच्या वाट्याला कोणती खाती? शिंदे- पवारांच्या पदरात काय? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली
हा अपघात भीषण होता. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी रक्ताचा रडा पडला होता. अनेक जण किंचाळत होते. मदतीसाठी याचना करत होते. पण त्याच वेळी तिथे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला होता.