निर्णयांचा धडका आणि घोषणांचा पाऊस, महायुती सरकारनं घेतले आणखी 15 निर्णय

State Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकांची आचरसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होणाऱ्यापूर्वी सत्तारुढ महायुती सरकारनं निर्णयांचा धडका लावला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकांची आचरसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होणाऱ्यापूर्वी सत्तारुढ महायुती सरकारनं निर्णयांचा धडका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी (14 ऑक्टोबर 2024) झालेल्या बैठकीत आणखी 15 निर्णय घेण्यात आले आहेत. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी (10 ऑक्टोबर 2024) झालेल्या बैठकीत तब्बल 80 निर्णय घेण्यात आले होते. सोमवारी झालेल्या निर्णयामध्ये मुंबईतील पाच प्रवेश मार्गावरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय पाहूया

मुंबईतल्या पाच प्रवेश प्रवेश मार्गवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ : हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील टोल नाक्यावर 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. 

दमणगंगा एकदरे, दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता 

दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस तसेच दमणगंगा वैतरणा गोदावदी नदी जोड योजनेस मान्यता देण्यात आली आहे.  या योजनेतून मराठवाड्यातील 10 हजार 11 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची किंमत 2 हजार 213 कोटी रुपये आहे.

दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेच्या 13 हजार 497 कोटी 24 लाख किंमतीच्या प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली.  हा प्रकल्प दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील 5.68 टीएमसी अतिरिक्त पाणी स्थानिक वापरासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुका आणि मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला याचा लाभ होईल. 

( नक्की वाचा : सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा? )
 

वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

वैजापूर तालुक्यातील शनीदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील या प्रकल्पामुळे 8.84 दलघमी पाणी साठा निर्माण होणार आहे. त्यामुळे 1978 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. या बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील नादुरुस्त अवस्थेतील कमालपूर व खानापूर या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी वापर शनीदेवगाव बंधाऱ्यातून करण्यात येईल. 

राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित 

पुणे जिल्ह्यातील मौ.जंक्शन, मौ.भरणेवाडी, मौ.अंथुर्णे, मौ.लासुर्णे येथील 131 हेक्टर 50 आर. अशी राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णय. ही जमीन चालू बाजारमुल्यानुसार देण्यात येईल.

( नक्की वाचा : 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची राज्य सरकारची शिफारस, वाचा संपूर्ण यादी )
 

पाचपाखाडीमधील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी 

ठाणे तालुक्यातील पाचपाखाडी येथील 534 सर्वे नंबर मधील 36 गुंठे 92 आर शासकीय जमीन ठाणे महापालिकेस प्रशासकीय भवनासाठी देण्यात येईल. 

हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामुल्य जमीन 

ठाणे तालुक्यातील खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामुल्य देण्याचा निर्णय 7 हेक्टर 69 गुंठे 34 आर ही शासकीय जमीन सामाजिक न्याय विभागास हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी एक विशेष बाब म्हणून देण्याचा निर्णय झाला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 


पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

या टप्प्यातील खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन मेट्रो मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.  या मार्गिंकांची एकूण लांबी 31.63 कि.मी. असून 28 उन्नत स्थानके आहेत.  यासाठी 9 हजार 817 कोटी 19 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पास महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास देखील मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. 

अन्य महत्त्वाचे निर्णय

- आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय
- समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम लागू.
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह समान हप्त्यात परतफेड करण्यास  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय 
- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे निर्माण करण्यास मान्यता
- खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळासाठी अभ्यासगट
- कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

Topics mentioned in this article