जाहिरात

15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची राज्य सरकारची शिफारस, वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. 

15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची राज्य सरकारची शिफारस, वाचा संपूर्ण यादी
मुंबई:

मराठा आरक्षणाचा लढा गेल्या दोन वर्षांपासून तीव्र बनला आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर आंदोलनं झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला या आंदोलनाचा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील सज्ज झाले आहेत. तर, धनगर समाजही एसटी प्रवर्गवातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. राज्यातील दोन प्रमुख समाज आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेले असतानाच राज्य सरकारनं नवा निर्णय घेतला आहे. 

विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळानं निर्णयाचा धडाका लावलाय. गेल्या काही बैठकांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या जातींची शिफारस?

बडगुजर 
सूर्यवंशी गुजर 
लेवे गुजर 
रेवे गुजर 
रेवा गुजर 
पोवार, भोयार, पवार 
कपेवार 
मुन्नार कपेवार 
मुन्नार कापू 
तेलंगा 
तेलंगी 
पेंताररेड्डी
रुकेकरी 
लोध लोधा लोधी 
डांगरी
 

( नक्की वाचा : शरद पवारांचा नवा डाव, भाजपाला देणार हादरा! दसऱ्यानंतर बडा नेता करणार सीमोल्लंघन? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com