
संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Ashadhi Wari 2025 : पंढरपूर वारीच्या वाटेवर महिला वारकरी भक्तांसाठी आता महिला आयोगातर्फे नवीन अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून महिला वारकरी भक्तांना स्वच्छतागृह , हिरकणी कक्ष आणि सॅनेटरी नॅपकिन स्टॉल कुठे आहेत? याची सहज माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे ॲप वारकरी महिला भक्तांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
तसेच अजितदादांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा व्हावी, अशी आपली ही इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर या पंढरपूरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पालखीतळांवर महिला वारकरी भक्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.
(नक्की वाचा- Pandharpur Wari 2025: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान, वारकऱ्यांची तुडूंब गर्दी)
सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गांवर आणि पंढरपूर शहरात एकूण 124 हिरकणी कक्ष उभा करण्यात येत आहेत. या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिलांचा प्राथमिक उपचार, स्वच्छतागृह , सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध केल्या जाणार आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टीने व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूरच्या वारीवर आवश्यकता सर्व सुविधा दिल्या जात आहेत.
तसेच , आपल्या नेत्याने सर्वोच्च पद भूषवावे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्याच पद्धतीने आपल्यालाही वाटते की अजित पवारांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी. याबाबत आज आपण विठ्ठल साकडे घातले असल्याचेही चाकणकरांनी सांगितले.
(नक्की वाचा- Wari News: 21 वर्षांची परंपरा! मुस्लिम बांधवांकडून संत बिहाणी पालखीला पहिली महापंगत)
भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या लाडकी बहिणी योजनेच्या पैशावरून लोक बूट चपला घालतात, असे विधान केले होते. याबाबत रूपाली चाकणकरांनी म्हटलं की , लोकप्रतिनिधी यांनी सामाजिक भान ठेवून बोलावे. लोणीकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवश्यक तो समज देतील. शासनाच्या कुठल्याही योजनेबद्दल महिलांबद्दल भान ठेवून बोलावे. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world