परभणीत खळबळ! शिक्षकाने AI चा वापर करून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, कपडे चेंज करताना व्हिडीओ काढला अन्...

Parbhani Crime News :  इंटरनेटच्या डिजिटल युगात आता नव्या तंत्रज्ञानाची म्हणजेच एआयची (AI) ची एन्ट्री झाली आहे. पण AI चा वापर हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Parbhani Crime News
मुंबई:

दिवाकर माने, परभणी

Parbhani Crime News :  इंटरनेटच्या डिजिटल युगात आता नव्या तंत्रज्ञानाची म्हणजेच एआयची (AI) ची एन्ट्री झाली आहे. पण AI चा वापर हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक लोक शिक्षणाचे धडेही गिरवत असल्याचं पाहायला मिळतंय. पण परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एका शिक्षकाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय. संतोष मालसवाड असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.

धक्कादायक म्हणजे या नराधम शिक्षकाने पीडित मुलीचा कपडे चेंज करताना चोरून व्हिडीओ काढला आणि त्यानंतर त्याने मुलीवर सतत अत्याचार केला. आरोपी शिक्षकाने व्हिडीओ सोबतच एआयचा वापर करून तिच्या फोटोमध्येही बदल केले. त्यानंतर तिला धमकी दिली. याप्रकरणी आरोपी शिक्षकासह अन्य तीन जणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

नक्की वाचा >> Video : कॉमेडियन पुन्हा आला चर्चेत! RJ महावशसोबत समय रैनाने धनश्री वर्माला डिवचलं, चहलनेही दिला भन्नाट रिप्लाय

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सेलू येथे एका धक्कादायक घटनेमुळं संतापाची लाट पसरली आहे. येथे शिक्षकी पेशेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संतोष मालसवाड नावाच्या शिक्षकाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचा केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीचे कपडे बदलताना व्हिडीओ काढला आणि तिचे फोटो एआयच्या माध्यमातून बदलले. त्यानंतर त्याने पीडितेला धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळं संपूर्ण परभणी जिल्हा हादरला असून पोलिसांनी आरोपी शिक्षकासह इतर तीन जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement