राकेश गुडेकर, रत्नागिरी
Ratnagiri News : दापोली तालुक्यातल्या दाभोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने पाचवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किशोर येवले असं या शिक्षकाचं नाव आहे. सोमवारी शाळा सुटल्यावर ही विद्यार्थिनी चालत आपल्या घरी जात होती, मात्र येवले याने तिचा पाठलाग करत तुला घरी सोडतो असं सांगून आपल्या दुचाकीवर बसवून तो मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला.
मात्र घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन मुलीशी असभ्य वर्तन वर्तन केलं. तसेच कुणाला सांगितल्यास 'जीवे मारेन' अशी धमकी दिली. त्यानंतर या मुलीने घडलेली घटना शेजारी सांगितल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या पालकांना बोलावले व या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात जात शिक्षक किशोर येलवे याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
(नक्की वाचा- Sangli News : दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; लैंगिक अत्याचारानंतर उचललं टोकाचं पाऊल)
दाभोळ पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून, मंगळवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्याची जेलमध्ये रवानगी केली आहे. या संतापजनक प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा - 300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं)
दरम्यान संबंधित शिक्षकास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी तत्काळ निलंबित केलं आहे. दापोलीचे गटशिक्षणाधिकारी यांनी आज या मुलीच्या पालकांची तसेच शाळेतील अन्य शिक्षकांची भेट घेऊन या घटनेची माहिती घेतली. या शिक्षकाविरोधात शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या घटनेचा अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.