विदर्भ तापला; अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

. विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये तर तापमाने आज चाळिशी पार केली. अकेल्यात आज सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

संजय तिवारी | नागपूर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने आज चाळिशी पार केली. अकोल्यात आज सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

विदर्भात कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

अकोल्यात आज ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीत ४२.८, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४३.१, गडचिरोली ४१.८, गोंदिया ४१.१, नागपूर ४१.४, वर्धा ४२.५, वाशिम ४३.६, यवतमाळमध्ये ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

उष्णतेची लाट, वाढता उकाडा आणि पाण्याच्या अभावामुळे मानसिक आरोग्य धोक्यात?

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती असण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Advertisement

राज्यातील इतर जिल्ह्यातही तापमानाचा कमालीची वाढ झालेली दिसत आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात उकाडा वाढला... 82 जणांना उष्माघात !

उन्हात बाहेर पडताना काय काळजी घ्याल?

  • उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.
  • जास्तीत जास्त फळे खा. मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
  • उन्हात घराबाहेर पडत असाल तर सुती किंवा पातळ कपडे घाला.
  • उन्हात फिरताना डोक्यात टोपी, डोळ्याला गॉगल घालण्याच प्रयत्न करा. 
  • उन्हातून फिरुन आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. 
  • सकाळी लवकर किंवा संध्याकाळी वेळ काढून व्यायाम करा.
     
Topics mentioned in this article