Thane VIDEO : 'मराठीत बोलणार नाही, सरकारला जाऊन सांग, निघ'; ठाण्यातील भारतगॅस एजन्सीत कर्मचाऱ्यांची मुजोरी

मराठी भाषा आणि संस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठाण्यातून मराठीला अपमानास्पद वागणूक दिल्याचं समोर आलं आहे. कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला अक्षरश: धक्के मारुन बाहेर काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane News : २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. याशिवाय काही दिवसांपूर्वीच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. मराठी भाषेला अभिजात करण्यासाठी व्यावसायिक पातळीवर भाषेचा सन्मान राखला जाणं आवश्यक आहे. मात्र वारंवार मराठी भाषेला अपमान केलं जात असल्याचं अनेक घटनांमधून समोर येतं. 

मराठी भाषा आणि संस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठाण्यातून मराठीला अपमानास्पद वागणूक दिल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील भारतगॅस एजन्सीमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाण्यातील आनंदनगर पश्चिमेकडील  साई शुभम गॅस सर्विस येथील काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला उद्धटपणे वागणूक दिल्याचं समोर आलं आहे. 

नक्की वाचा - Video : 1 तरुण अन् 5 वृद्ध; अंगावर चढून धू धू धुतलं, ज्याच्यासाठी भांडण तो मात्र पळाला; Video होतोय व्हायरल

Advertisement

गॅस बुकिंग होत नसल्याने ग्राहक एजन्सीकडे तक्रार घेऊन गेला गेला होता. मात्र दोघांमध्ये वाद झाला. यानंतर गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणासोबत ग्राहकाचा वाद झाला. तो हिंदी भाषिक होता. त्याला मराठी येत नव्हतं. याबाबत ग्राहकाने भारतगॅसमधील महिला कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी ग्राहकालाच दोन शब्द ऐकवले आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक दिलं.  ग्राहकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. व्हिडिओमध्ये महिला म्हणते, मराठीत बोलणार नाही हिंदीत बोलणार. तुझ्यात हिम्मत असेल तर सरकारला जाऊन सांगा. चल निघ इथून.. असं म्हणत गॅस एजन्सीचे कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला कार्यालयाबाहेर काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.