जाहिरात

तरुणीचे ऑनर किलिंग हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर कुटुंबीयांचा हल्ला

कुटुंबीयांच्या मनाविरूद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या 'ऑनर किलींग'चा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर तरूणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केलाय.

तरुणीचे ऑनर किलिंग हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर कुटुंबीयांचा हल्ला
अकोला:

संजय तिवारी, प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे. कुटुंबीयांच्या मनाविरूद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या 'ऑनर किलींग'चा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर तरूणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केलाय. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या पेडका पिंपरडोळी गावालगतची ही घटना आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण ?

या प्रकरणातील मुलीनं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर ती नवऱ्यासोबत राहत होती. त्यामुळे तिचे घरचे नाराज होते. मुलीची आई आणि मामानं मुलीच्या सासुरवाडीला जाऊन भांडण केलं. त्यांनी मुलीला सोबत येण्याचा आग्रह केला. आणखी तणाव टाकण्यासाठी मुलगी सोबत निघण्यास तयार झाली. त्यावेळी तिच्या नवऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीच्या जीवाला धोका असून तिला वाचवा, अशी तक्रार केली. 

मुलीच्या नवऱ्यानं सांगितलेल्या रस्त्यानं लीस ठाण्याचे कर्मचारी  निघाले तेव्हा रस्त्यात हातात कुऱ्हाड घेऊन तिचे कुटुंबीय तिच्याशी वाद घालताना आणि तिला मारून टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. पोलिसांनी ऐनवेळी पोहोचून ती कुऱ्हाड हिसकावून घेतल्यावर त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

( नक्की वाचा : फोनवरुन निवृत्त मॅनेजरला घातला 72 लाखांचा गंडा, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार )
 

पोलीस शिपाई सांगळे यांच्या सतर्कतेमुळे या घटनेतील आंतरजातीय प्रेमविवाह केलेली तरूणी बचावली. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना अकोल्याच्या चान्नी पोलिसांनी अटक केली. संगम रंभाजी ताजने, विजय उर्फ पिंटु रंभाजी ताजने आणि श्रीमती कांताबाई रंभाजी ताजने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
तरुणीचे ऑनर किलिंग हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर कुटुंबीयांचा हल्ला
Minister Shambhuraje Desai orders Satara police to Take strict action against teasing
Next Article
टवाळखोरी कराल तर थेट धिंड निघणार, 'या'नेत्याने दिले थेट आदेश