जाहिरात

Train Update : अमळनेरजवळ मालगाडी घसरली, सुरत- भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत, वाचा नवं वेळापत्रक

Train Update : अमळनेरजवळ मालगाडी घसरली, सुरत- भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत, वाचा नवं वेळापत्रक
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली. या अपघातामध्ये  सुदैवाने लोको पायलटसह गार्ड हे सुरक्षित असून जीवित हानी टळली आहे. पण रेल्वे वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. तब्बल पाच तास या मार्गावरची वाहतूक विस्कळीत होती.  

भुसावळकडून कोळसा घेऊन नंदुरबारकडे जात असताना अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे 5 तासापासून सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या असून  काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे अपडेट?

  • अपघातामुळे सिकंदराबाद हिसार एक्सप्रेस गेल्या 5 तासापासून धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली
  • सुरत अमरावती एक्सप्रेस शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आलेली आहे 
  • दानापूर स्पेशल फेअर एक्सप्रेस नरडाणा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली.
  • दानापूर-उधना एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आलेली आहे. 

( नक्की वाचा : Jalgaon : पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण, वडिलांचा आधार असलेल्या कर्तबगार मुलीचा अपघाती मृत्यू )
 

  • गाडी क्र. 09066 छपरा – सुरत विशेष रेल्वे ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
  • गाडी क्र. 19046 छपरा – सुरत एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
  • गाडी क्र. 22723 नांदेड – श्री गंगानगर एक्सप्रेस ही जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाडमार्गे वळविण्यात आली आहे.
  • गाडी क्र. 20934 दानापूर – उधना एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
  • गाडी क्र. 06157 चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी विशेष रेल्वे भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.
  • गाडी क्र. 22972 पाटणा – बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, बांद्रा टर्मिनस मार्गे वळविण्यात आली आहे.
  • गाडी क्र. 20861 पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, अहमदाबाद मार्गे वळविण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे (दिनांक 15.05.2025):

गाडी क्र. 19004 भुसावळ – दादर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 19006 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 19008 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com