जाहिरात

Ashadhi Wari 2026: 7 जुलै ते 9 ऑगस्ट; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 34 दिवसांचे संपूर्ण वेळापत्रक वाचा

Tukaram Maharaj Palkhi 2026: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. 7 जुलै रोजी देहूवरून सुरू होणाऱ्या या प्रवासाचे मुक्काम आणि रिंगण सोहळ्याची माहिती येथे वाचा.

Ashadhi Wari 2026: 7 जुलै ते 9 ऑगस्ट; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 34 दिवसांचे संपूर्ण वेळापत्रक वाचा
"Tukaram Maharaj Palkhi 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक"

- सूरज कसबे, प्रतिनिधी
Tukaram Maharaj Palkhi:
लाखो वैष्णवांचा मेळा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या पालखी सोहळ्याचे कार्यक्रम नियोजन जाहीर झाले आहे. श्री क्षेत्र देहूगाव येथून 7 जुलै रोजी हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी या नियोजनाची अधिकृत घोषणा केली.

यंदा अधिक मास (धोंड्याचा महिना) असल्यामुळे सोहळा कार्यक्रमाला गतवर्षाच्या तुलनेत 19 दिवसांच्या फरकानंतर प्रारंभ होत आहे. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी संस्थानने जय्यत तयारी सुरू केली आहे.

संस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणा| Announcement in the Presence of Sansthan Officials

पालखी सोहळ्याच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, लक्ष्मण मोरे, उमेश मोरे, तसेच विश्वस्त गणेश मोरे, वैभव मोरे आणि दिलीप मोरे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याच्या प्रत्येक टप्प्याचे आणि मुक्कामाचे नियोजन निश्चित करण्यात आले.

पुणे शहरात दोन दिवस, इतर ठिकाणी एकच मुक्काम |  Tukaram Maharaj Palkhi 2026

परंपरेनुसार यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पुणे शहरातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवसांचा मुक्काम असेल. हा 2 दिवसांचा अपवाद वगळता, पालखी मार्गावरील इतर प्रत्येक ठिकाणी सोहळ्याचा केवळ एकच मुक्काम असणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना एका ठराविक गतीने पंढरीची वाट चालावी लागणार आहे.

(नक्की वाचा : Ashadhi Wari 2026: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा 33 दिवसांचा प्रवास; यंदा माऊलींचे रिंगण कुठे-कधी होणार?वाचा)

रिंगण सोहळ्यांचे भव्य आकर्षण | Ringan Sohala

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या ऊर्जेचे आणि आनंदाचे मुख्य आकर्षण असलेले भव्य रिंगण सोहळे विविध ठिकाणी रंगणार आहेत.

  • गोल रिंगण: परंपरेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर इंदापूर आणि अकलूज येथील माने विद्यालयाजवळ गोल रिंगण पार पडेल.
  • उभे रिंगण: माळीनगर, बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी पादुका आरती येथे भाविकांना नेत्रदीपक उभे रिंगण पाहायला मिळणार आहे.
  • धावा: तोंडले बोंडले येथे ऐतिहासिक 'धावा' सोहळा पार पडणार आहे, जिथे भाविक भक्तीच्या भरात विठ्ठल नामाचा गजर करत धावतात.
पालखी सोहळ्याचा सविस्तर प्रवास आणि मुक्काम (7 जुलै ते 24 जुलै) | Detailed Itinerary and Daily Halts of the Palkhi

7 जुलै रोजी देहूतील मुख्य मंदिरातून पालखीचे प्रस्थान होईल. तिथून सुरू होणारा हा भक्तीचा प्रवास खालीलप्रमाणे असेल:

7 जुलै: प्रस्थान - पहला मुक्काम (इनामदार साहेब वाडा, श्री क्षेत्र देहूगाव)
8 जुलै: आकुर्डी (विठ्ठल मंदिर)
9 आणि 10 जुलै: पुणे (श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नानापेठ - दोन दिवस मुक्काम)
11 जुलै: लोणी काळभोर (विठ्ठल मंदिर)
12 जुलै: यवत
13 जुलै: वरवंड
14 जुलै: उंडवडी गवळ्याची
15 जुलै: बारामती (शारदा विद्यालय)
16 जुलै: सणसर
17 जुलै: बेलवडी (पहिले गोल रिंगण आणि मुक्काम)
18 जुलै: निमगाव केतकी
19 जुलै: इंदापूर (गोल रिंगण आणि मुक्काम)
20 जुलै: अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण आणि मुक्काम)
21 जुलै: बोरगाव (माळीनगर येथे उभे रिंगण आणि मुक्काम)
22 जुलै: पिराची कुरोली (तोंडले बोंडले येथे धावा आणि मुक्काम)
23 जुलै: वाखरी तळ (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण आणि मुक्काम)

24 जुलैला पंढरपुरात विसावा आणि प्रदक्षिणा| Arrival in Pandharpur and Holy Circumambulation24 जुलै रोजी दुपारी 1 वाजल्यानंतर पालखी वाखरी तळाहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. त्याच रात्री हा सोहळा पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावेल. त्यानंतर  25 जुलै रोजी पारंपरिक नगर प्रदक्षिणा केली जाईल. आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानंतर, पालखी 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पंढरपूर येथेच मुक्कामी राहणार असणार आहे. 

30 जुलै महाळुंगे माकडाचे (श्री विठ्ठल मंदिर)
31 जुलै वडापुरी (नाथ मंदिर)
1 ऑगस्ट लासुर्णे (श्री महादेव मंदिर)
2 ऑगस्ट बऱ्हाणपूर ( श्री मारूती मंदिर)
3 ऑगस्ट हिंगणीगाडा (श्री विठ्ठल मंदिर)
4 ऑगस्ट वरवंड ((श्री विठ्ठल मंदिर)
5 ऑगस्ट कुंजीरवाडी फाटा 
6 ऑगस्ट  पुणे नवी पेठ (श्री विठ्ठल मंदिर) 
7 ऑगस्ट संपूर्ण दिवस श्री विठ्ठल मंदिर
8 ऑगस्ट पिंपरी गाव (श्री भैरवनाथ मंदिर)
9 ऑगस्ट श्रीक्षेत्र देहू मुख्य मंदिर

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com