- विशाल पुजारी, कोल्हापूर
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेसने दोन महिलांसह एका लहान मुलीला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे. रेल्वे रुळावरून चालत जाणाऱ्या दोन महिला आणि एका लहान मुलीला एक्सप्रेसने चिरडले आहे. शुक्रवारी (14 जून) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघींही रेल्वे रुळावरून चालत होत्या. त्यावेळेस एक्सप्रेसची त्यांना धडक बसली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. शाहूपुरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
(ट्रेडिंग न्यूज: वेळापत्रक पाहून करा प्रवास! पश्चिम रेल्वेवर शनिवारी तर मध्य-हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने कोयना एक्सप्रेस येत होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे मार्गावरून कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. याच दरम्यान विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने दोन महिला आणि एक लहान मुलगी रुळावरून चालत होत्या. याच वेळेस मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या कोयना एक्सप्रेसने तिघींना चिरडले. या भीषण अपघातात तिघींचाही मृत्यू झाला. ही घटना अपघात होता की आत्महत्या याबाबत ठोस माहिती समोर आली नाही. मृत पावलेल्या दोघींचे चेहरे अपघातामुळे अतिशय विद्रुप झाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर लहान मुलीचा चेहरा काही प्रमाणात दिसत असल्याने पोलीस यावरून नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
(ट्रेडिंग न्यूज: Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट)
दरम्यान अपघातानंतर लोको पायलटने काही अंतरावर जाऊन रेल्वे थांबवली. या लोको पायलटने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेच शाहूपुरी पोलीस यांना माहिती देण्यात आली. संपूर्ण घटनेचा तपास आता शाहूपुरी पोलीस करत आहेत.
मृत पावलेल्यांपैकी एक महिला 40 ते 45 वयोगटातील तर दुसरी महिला 20 ते 25 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. मृत लहान मुलगी ही 10 ते 12 वर्षाची असल्याचे सांगितले जात आहे.
(ट्रेडिंग न्यूज: UGC NET Admit Card 2024 कार्ड कधी मिळणार? परीक्षेची संधी हातची जाण्याची विद्यार्थ्यांना भीती)
अपघात की आत्महत्या तपास सुरू?
शुक्रवारी (14 जून) रात्री झालेली ही दुर्घटना अपघात की आत्महत्या? याबाबत शंका निर्माण होत आहेत. मार्केट यार्ड परिसरातील या मार्गावर रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला मानवी वस्ती आहे. त्यामुळे छोटीशी पायवाट देखील या ठिकाणी आहे. या परिसरातील रेल्वे मार्गावर लांबून येणारी रेल्वे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे या तिघींना रेल्वे दिसली असू शकते तरी देखील हा अपघात कसा घडला? याबाबत प्रश्न उपस्थित होतोय याबाबत अधिक तपास सुरू आहे.
Sangameshwar Bazar Fire | आगडोंब! रत्नागिरीतील संगमेश्वर बाजारपेठ पेटली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world