निनाद करमारकर, उल्हासनगर: उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून आठ अल्पवयीन मुलींनी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खिडकीच्या जाळ्या तोडून या मुली पसार झाल्या होत्या. याबाबत हिललाईन पोलिसांनी तातडीने शोधमोहिम राबवत सात मुलींना ताब्यात घेतले आहे तर एक मुलीचा शोध अद्याप सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातून ८ अल्पवयीन मुली खिडकीच्या जाळ्या तोडून पळून गेल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी शोधमोहीम राबवत उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातून ७ अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं असून एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना सापडलेली नाही.
उल्हासनगर शहरात किंवा स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर, अनाथ किंवा भीक मागणाऱ्या, बालकामगार मुलींना ताब्यात घेऊन शासकीय निरीक्षणगृहात ठेवलं जातं. मात्र यापैकी 15 ते 17 वयोगटातील काही मुलींना निरीक्षणगृहात राहणं आवडत नसल्यानं त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, आणि मंगळवारी खिडकीच्या जाळ्या तोडून आठ मुली पळून गेल्या.
नक्की वाचा : जीडीपी घसरण्याचा केंद्र सरकारने वर्तवला अंदाज, सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल ?
यानंतर पोलिसांनी यापैकी ७ मुलींना शोधून पुन्हा निरीक्षणगृहात दाखल केलं, तर एक मुलगी सापडलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world