जाहिरात

Amit Shah at Raigad : 'शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका', अमित शाह यांचं रायगडावरुन राज्यातील जनतेला आवाहन

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपस्थिती दर्शवली.

Amit Shah at Raigad : 'शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका', अमित शाह यांचं रायगडावरुन राज्यातील जनतेला आवाहन

Union Minister Amit Shah at Raigad : स्व-धर्माचा अभिमान, स्व-राज्याची आकांक्षा आणि स्व-भाषेला अमर करणं हे विचार देशाच्या सीमेपुरते मर्यादित असू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे. शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, छत्रपती शिवाजी महाराजांकडून देशच काय जग प्रेरणा घेऊ शकतं, असं आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रायगडावरुन केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांना शिंदेशाही पगडी आणि कवड्यांची माळ भेट म्हणून देण्यात आली. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी जिजाऊंना अभिवादन केलं. ते म्हणाले, मी शिवचरित्र वाचलंय. जिजाऊंनी शिवरायांना केवळ जन्मच दिला नाही तर स्वराज्याची प्रेरणा दिली. एका बाळ शिवाला देशाला स्वतंत्र करण्याचा विचार जिजाऊंनी दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बनवण्याचा विचारही जिजाऊंनी दिला. रायगडावर उभा असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करताना माझ्या मनात दाटून आलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. 

Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण

नक्की वाचा - Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण

शिवरायांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा देश अंध:कारात बुडाला होता. अशावेळी कोणाच्याही मनात स्वराज्याची कल्पना येण अशक्य होतं. कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. मात्र तरीही एक 12 वर्षांचा मुलगा जिजाऊंच्या प्रेरणेने प्रतिज्ञा सिंधू ते कन्याकुमारीपर्यंत भगवा फडकवण्याची प्रतिज्ञा करतो, हे अद्भूत आहे, असंही शाह यावेळी म्हणाले. मी आजपर्यंत जगातील अनेक नायकांचे चरित्र वाचले आहेत. मात्र अशी दृढ इच्छाशक्ती, दुर्दम्य साहस, रणनीती आणि ती रणनीती पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला एकत्र जोडून कधीही पराभव न होणाऱ्या सैन्याची निर्मिती करणं शिवरायांशिवाय कोणीच करू शकलेलं नाही. 

अमित शाह पुढे म्हणाले, मी आजपर्यंत जगातील अनेक नायकांचे चरित्र वाचले. मात्र अशी दृढ इच्छाशक्ती, दुर्दम्य साहस, जबरदस्त रणनीती आणि ती रणनीती पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला एकत्र जोडून कधीही पराभव न होणाऱ्या सैन्याची निर्मिती करणं छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय  कोणीच करू शकलेलं नाही. स्व-धर्माचा अभिमान,  स्व-राज्याची आकांक्षा आणि स्व-भाषेला अमर करणं हे विचार देशाच्या सीमेपुरते मर्यादित असू शकत नाही. हे मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडलेले आहेत. शिवरायांनी हे तीन विचार गुलामगिरीत असताना जगासमोर ठेवले. मी इथं कसलंही राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, शिवरायांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. शिवरायांच्या स्मृतीतून अनुभूती घेण्यासाठी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आलोय.