जाहिरात

Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण

BJP vs Shiv Sena : राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे.

Palgahr : भाजपा-शिवसेना वादाचं (पाल) 'घर', फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये दरबाराचं राजकारण
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

BJP vs Shiv Sena : राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे. विशेषत: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हा प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्हा देखील या वादाचं नवं केंद्र बनत आहे. फडणवीस सरकारमधील दोन मंत्री या जिल्ह्यात आमने-सामने आले आहेत. 

पालघरच्या पालकमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर गणेश नाईक यांनी  पालघरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत दोन जनता दरबार घेतले असून, यापुढेही घेणार आहेत. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लोक दरबार आयोजित केला. त्यामुळे  त्यामुळे पालघर जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून शिवसेना आणि भाजपच्या मंत्री आणि नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र लोकांच्या मूलभूत समस्यांकडे सरकार आणि प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 
राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पालघर जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.भाजपचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आव्हान देण्यासाठी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार आयोजित करण्यात आला आहे. लोकदरबाराच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा भरात लावलेल्या बॅनरवर शिंदे सेना वगळता महायुतीच्या नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

पालघर जिल्ह्यात भाजपचे तीन तर शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत.जिल्ह्यात विरोधी पक्षाचा एकच आमदार असताना जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये सुरु असलेल्या कुरघोडी बाबत जिल्ह्यात जोरदार बाबत चर्चा सुरु आहे.

( नक्की वाचा : शरद पवारांची मोदी सरकारला साथ, लोकसभेत केलं बाजूनं मतदान! सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण, Video )

सारवासारवीचा प्रयत्न

याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की. 'आम्ही महायुतीत आहोत.. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही रोखलेला नाही.. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आमदारांना कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात काहीही वावगं नाही.' 

तर, हे मीडियाने दिलेल्या बातम्या आहेत, हे बरोबर नाही..महायुतीच्या सरकारने दिलेली ही जबाबदारी आहे. कुठल्याही खात्याचा मंत्री कुठेही जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काम करायची आहे . पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पालघर जिल्ह्यावर आनंद दिघे साहेबांचं विशेष प्रेम होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देखील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम आहे. त्यांचा वसा घेऊन शिवसैनिक कामाला लागले आहेत. आमची संघटना वाढवायची आहे. एकाचा दरबार झाला म्हणजे दुसऱ्याने बार बार घ्यायचा नाही असं नाही. असे प्रताप सरनाईक म्हणाले.

 पालघर जिल्हा सध्या राज्यात विकासाचा केंद्रबिंदू झाला आहे, जिल्ह्यात वाढवण बंदर प्रकल्प, बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, DFCC, विमानतळ, टेक्सटाईल पार्क असे अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात पिण्याचे पाण्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा सुविधा, रस्ते, शिक्षण आणि इतर दळणवळणाच्या मोठ्या समस्या आहेत. याबाबत मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे सामान्य नागरिकांचा आरोप आहे. 
 
राज्यात महायुतीमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेनामधील अंतर्गत नाराजी आणि कुरघोडीचं राजकारण यापूर्वी अनेकदा उफाळून आलं आहे. विशेषत: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हा प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्हा देखील या वादाचं नवं केंद्र बनत आहे. फडणवीस सरकारमधील दोन मंत्री या जिल्ह्यात आमने-सामने आले आहेत. 

पालघरच्या पालकमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर गणेश नाईक यांनी  पालघरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत दोन जनता दरबार घेतले असून, यापुढेही घेणार आहेत. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लोक दरबार आयोजित केला. त्यामुळे  त्यामुळे पालघर जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून शिवसेना आणि भाजपच्या मंत्री आणि नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र लोकांच्या मूलभूत समस्यांकडे सरकार आणि प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 

राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पालघर जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.भाजपचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आव्हान देण्यासाठी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार आयोजित करण्यात आला आहे. लोकदरबाराच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा भरात लावलेल्या बॅनरवर शिंदे सेना वगळता महायुतीच्या नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

पालघर जिल्ह्यात भाजपचे तीन तर शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत.जिल्ह्यात विरोधी पक्षाचा एकच आमदार असताना जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये सुरु असलेल्या कुरघोडी बाबत जिल्ह्यात जोरदार बाबत चर्चा सुरु आहे.

सारवासारवीचा प्रयत्न

याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की. 'आम्ही महायुतीत आहोत.. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही रोखलेला नाही.. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आमदारांना कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात काहीही वावगं नाही.' 

तर, हे मीडियाने दिलेल्या बातम्या आहेत, हे बरोबर नाही..महायुतीच्या सरकारने दिलेली ही जबाबदारी आहे. कुठल्याही खात्याचा मंत्री कुठेही जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला काम करायची आहे . पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पालघर जिल्ह्यावर आनंद दिघे साहेबांचं विशेष प्रेम होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देखील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम आहे. त्यांचा वसा घेऊन शिवसैनिक कामाला लागले आहेत. आमची संघटना वाढवायची आहे. एकाचा दरबार झाला म्हणजे दुसऱ्याने बार बार घ्यायचा नाही असं नाही. असे प्रताप सरनाईक म्हणाले.

 पालघर जिल्हा सध्या राज्यात विकासाचा केंद्रबिंदू झाला आहे, जिल्ह्यात वाढवण बंदर प्रकल्प, बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, DFCC, विमानतळ, टेक्सटाईल पार्क असे अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात पिण्याचे पाण्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा सुविधा, रस्ते, शिक्षण आणि इतर दळणवळणाच्या मोठ्या समस्या आहेत. याबाबत मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे सामान्य नागरिकांचा आरोप आहे. 
 
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: