जाहिरात
17 days ago

वैष्णवी हगवणेची सासू, नवरा आणि नणंदेची पोलीस कोठडी आज संपतेय. या तिघांना आज पुणे कोर्टात दुपारी तीन वाजता हजर केलं जाणार आहे.  वैष्णवी आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीवर गंभीर आरोप केले आहेत. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबावरचे गंभीर आरोपही समोर आले आहेत.

महाराष्ट्रात 76 नवे कोरोना रुग्ण आढळले, एकूण संख्या 425, 7 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात 76 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 425 अॅक्टीव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर  7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 27, पुण्यात 21,ठाणे 12,कल्याण 8, नवी मुंबई 4, कोल्हापूर 1,अहिल्यानंगर 1 आणि  रायगड 2 अशी कोरोना रुग्णांची संख्या आहे. जानेवारीपासून आज पर्यंत एकून 597 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 165 रुग्ण हे बरे झाले आहेत. 

महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या 42 प्रकल्पांना मान्यता

केंद्रीय पर्यावरण खात्याकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील प्रलंबित विकास परवानगींना तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली. यादव यांनी देखील मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित परवानगी तसेच विविध विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

नांदेड जिल्ह्यातील गारगव्हाण येथे खदानीत बुडून 2 मुलांचा मृत्यू

हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथे खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे या दोन मित्रांचा मृत्यू  झाला आहे.  शेताकडे जाताना एक जण पाय घसरून खदानीत पडला , त्याला वाचवाताना दुसरा मुलगाही बुडाला.

वैष्णवी हगवणेच्या नवरा, सासू आणि नणंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

वैष्णवी हगवणेच्या नवरा, सासू आणि नणंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघांची ही पोलिस कोठडी आज संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचा आता जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्यांना जामीन मिळतो की नाही ते पाहावे लागणार आहे.  

हगवणेचा नातेवाईक जालिंदर सुपेकर यांची अतिरिक्त जबाबदारी काढून घेतली

राज्य सरकारने कारागृह विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर असलेली अतिरिक्त जबाबदारी काढून घेतली आहे. सुपेकर सध्या “विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या पदावर कार्यरत होते. यासोबतच त्यांच्याकडे “कारागृह उप महानिरीक्षक, नागपूर”, तसेच “लांतिक विभाग, महिला विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर” या तीन विभागांची अतिरिक्त जबाबदारी होती. ते हगवणे कुटुंबाचे नातेवाईतक आहेत. त्यांच्या नावाने हगवणे कुटुंबं हे वैष्णवीच्या घरच्यांना धमकावत होते. 

कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक, 6 कोटींचे होते बक्षीस

कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमा याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर तब्बल 6 कोटींचे बक्षीस होते. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, कुंजम हिडमा याला ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बैपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून अटक केली आहे. एके-47 आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा यावेळी जप्त केला आहे.

Live Update : धाराशिवमध्ये पुन्हा जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात

धाराशिवमध्ये पुन्हा जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात

धाराशिव कळंब,तुळजापूर परीसरात गेल्या अर्धा तासापासून पावसाची जोरदार बॅटींग

बहुतांश ठिकाणी साचले पाणी तर वाहन धारकांना देखील करावी लागतेय मोठी कसरत

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याची खरीप पुर्व मशागतीची काम झाली ठप्प

Live Update : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका नव्या आरोपीचा समावेश

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका नव्या आरोपीचा समावेश 

तपासामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने तुळजापुरातून शुभम सुरेश नेपते या तरुणाला अटक 

ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग , तर 19 आरोपी अटक 

तामलवाडी पोलिसांकडून शुभमच्या अटकेची कारवाई

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 18 आरोपी अजूनही फरार, नोटीस बजावलेल्या अनेकांचा तपास सुरू

Live Update : विठ्ठल मंदिरात भाविकाच्या डोक्यावर कोसळला दगड...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये एका वयोवृद्ध भाविकाच्या डोक्यात दगड कोसळल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. बुधवारी दुपारी मंदिरामध्ये भाविक दर्शन करून येत असताना , भाविकाच्या डोक्यात दगड कोसळला. सध्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. याच कामादरम्यानचा दगड बार्शी येथील भाविक नंदकुमार बोटे यांच्या डोक्यात पडला. यामध्ये भाविक जखमी झाला असून त्यांच्यावर तात्काळ उपजिल्हा रुग्णालय उपचारही करण्यात आले आहेत. मात्र या घटनेनंतर मंदिरातील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे येत आहे.

Live Update : सिंधुदुर्गात पावसाचा वेग मंदावला भात पेरणीसाठी पोषक वातावरण

सिंधुदुर्गमध्ये पावसाचा वेग मंदावला आहे. काल दुपारपासून ढगाळ वातावरण आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी देखील कमी झाली आहे.  गेले चार दिवस सतत पडणारा पावसाने काल दुपारनंतर थोडीशी विश्रांती घेतली असल्याचे दिसत आहे.  हे वातावरण शेतकऱ्यांना पोषक असल्याने शेतकऱ्यांची शेतीची लगबग सुरू होणार असून भात पेरणीला शेतकरी सुरुवात करत आहेत

Live Update : वेळेपूर्वी दाखल झालेल्या पावसामुळे भुईमूग शेती पाण्यात

नियोजित वेळेपूर्वी पाऊस दाखल झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमूग शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भुईमूग पीक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढले जाते. मात्र, २० मे पासून पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावल्याने भुईमूग शेती पाणी घुसून शेंगदाणा कुजून गेला आहे. यामुळे कुडाळ तालुक्यातील हुमरमळा - राणे वाडीतील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Live Update : खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिक्कीम दौरा रद्द

Live Update : खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सिक्कीम दौरा रद्द

Live Update : सोलापूर जिल्ह्यातील मागच्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर जिल्ह्यातील मागच्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग 

मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून लागली वाहू

धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोगवती नदी सीनेला येऊन मिळालाल्याने सीनेचा प्रवाह वाढला 

मोहोळ तालुक्यासह दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूरची वरदायिनी म्हणून आहे सीना नदीची ओळख 

सध्या सीना नदीची पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना दिला आहे सतर्कतेचा इशारा 

शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा.

Live Update : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत रोबोटिक बोट वाटप

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस स्टेशन आणि तीन नगरपालिका एक नगरपंचायत असे दहा ठिकाणी रोबोटिक बोटींचे वाटप करण्यात आले. ही बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे कारण एक माणूस वाचवण्यासाठी आपण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो. पण आता दुसऱ्या माणसा ऐवजी ही रोबोटीक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे. या बोटीची दोनशे किलोग्राम पर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे.

केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी या बोटीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Live Update : डिजिटल अरेस्टची धमकी देत सेवानिवृत्त प्राध्यापिकेला साडे 3 कोटींचा गंडा

डिजिटल अरेस्टची धमकी देत कोल्हापुरात सेवानिवृत्त प्राध्यापिकेला साडे तीन कोटींचा गंडा घातला. मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू, अशी भीती घालून सायबर भामट्यांनी ही फसवणूक केली. सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे यांनी याबाबत राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिलीये. 18 एप्रिल ते 27 मे 2025 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Live Update : चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी व पपईच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने शेती पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर आता मान्सूनपूर्व पावसामुळे केळी, पपई या फळबागांना मोठा फटका बसला आहे

Live Update : पावसाळ्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क

पावसाळ्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क 

पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग करणार प्राण्यांचे लसीकरण 

पावसाळ्यापूर्वी ५ लाखांपेक्षा अधिक प्राण्यांचे लसीकरण पूर्ण 

संसर्गजन्य आजारापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येणार लसीकरण 

१५ जून पर्यंत पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार विशेष लसीकरण मोहीम

पावसाळ्यात डास, फर्या (ब्लॅक क्वार्टर – बीक्यू ), एन्टरोटॉक्सिमिया आणि लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) सारख्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम

मोहिमेअंतर्गत मिळालेल्या ५,९७,२०० लसींचा साठा गावपातळीवर वितरित करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व लसीकरणात ३,४७,३९६ गायी, ३६,८०८ म्हशी आणि २८,०७४ वासरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Live Update : अकोल्यात पावसाने नागरिकांची दाणादाण

अकोल्यात मंगळवारी झालेल्या पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आ. साजिद खान पठाण यांनी आज आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले..या बैठकीस मनपा आयुक्त, उपायुक्त, नायब तहसीलदार तसेच महावितरण, आरोग्य विभाग, मनपा यंत्रणा व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पठाण यांनी या बैठकीत नागरिकांचे हाल होऊ नये याकरिता तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देत आपत्कालीन कक्षाचा क्रमांक सार्वजनिक करण्याचे झोन निहाय आणि प्रभागनिहाय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्याचे निर्देश दिलेय.. तर नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी दिलेय..तर नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवल्या नाही गेल्यास अधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात बसू देणार 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com