
सुरज कसबे, पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला तब्बल 10 दिवसांनी अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबियाला मदत केल्याप्रकरणी तसेच वैष्णवीच्या 9 वर्षीय मुलाचा ताबा देण्यास नकार दिल्याप्रकरणी निलेश चव्हाण पोलिसांच्या रडारवर होता. 10 दिवसांनंतर त्याला नेपाळ बोर्डरवरुन अटक करण्यात आली. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून एका मैत्रिणीच्या फेसटाईम कॉलमुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाणच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळं त्याच्या पहिल्या लोकेशनचा क्लु पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाला. तर फेसटाईम कॉलने निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झाला अन त्यानंतर दहा दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या.
निलेश चव्हाण 26 मेला नेपाळमध्ये पोहचताच त्याने तिथले सिम कार्ड विकत घेतले. याचा वापर फक्त इंटरनेटचा वापर करण्यासाठी केला. याद्वारे त्याने अँपल फोनमधील फेसटाईम कॉलिंग केले. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने मोठा कस लावला आणि फेसटाईम कॉलिंगचे आयपी अडड्रेस मिळवले. या आधारे त्यांना निलेशचे नेपाळमधील लोकेशन प्राप्त झाले. त्यामुळं निलेशला भारतात घटस्फोटित मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं अन नेपाळमध्ये फेसटाईम कॉलिंग करणं भोवल्याचं दिसून आले.
नक्की वाचा - Operation Sindoor नंतर वादग्रस्त व्हिडिओ, पुण्याच्या मुलीला बंगाल पोलिसांकडून अटक! AIMIM नेत्यावर आरोप
दरम्यान, शनिवारी निलेश चव्हाणला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीदरम्यान पोलिसांनी त्याला पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने त्याला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world