जाहिरात

प्रकाश आंबेडकरांना होम ग्राऊंडवर मोठा धक्का; बड्या नेत्याने साथ सोडली

Akola News : डॉ. हुशे हे वंचित बहुजन आघाडी गेल्या 30 वर्षांपासून आंबेडकरांसोबत कार्यरत आहेत. माळी समाजातील मोठे प्रस्थ अशी हुशे यांची ओळख आहे.

प्रकाश आंबेडकरांना होम ग्राऊंडवर मोठा धक्का; बड्या नेत्याने साथ सोडली

 योगेश शिरसाठ, अकोला

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकर यांना आपलाच गड असलेल्या अकोल्यत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलात.‌ डॉ. संतोष हुशे उद्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातल्या वाडेगाव येथील उद्धव ठाकरेंच्या सभेत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ. हुशे हे वंचित बहुजन आघाडी गेल्या 30 वर्षांपासून आंबेडकरांसोबत कार्यरत आहेत. माळी समाजातील मोठे प्रस्थ अशी हुशे यांची ओळख आहे. अकोला जिल्ह्यात वंचितमधील प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख  आहे. अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे डॉ. हुशे नाराज होते. अशातच त्यांना वंचितची साथ सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

(नक्की वाचा  - लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार, शिंदेनी दिली 10 मोठी आश्वासनं)

कोण आहेत प्रा. डॉ. संतोष हुशे?

  • वंचित बहुजन आघाडीतील मोठा ओबीसी चेहरा 
  • माळी समाजातील अतिशय आदर असलेले नेते 
  • गेल्या 40 वर्षांपासून आंबेडकरांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची अकोला जिल्ह्यात ओळख 
  • अकोल्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि व्यापारी वर्तुळातील मोठं नाव 
  • अकोला शहरातील ख्यातनाम 'हुशे बंधू ज्वेलर्स'चे संस्थापक

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com