
Kolhapur News : हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थातून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. गटारातील पाण्याने भाज्या धुणं असो वा अन्नपदार्थात दूषित पाण्याचा वापर असो... यासांरख्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान या प्रकरणात आणखी एका घटनेची भर पडली आहे. कोल्हापुरातीस छत्रपती प्रमिलाराजे सर्वोचार रुग्णालयाच्या समोर हातगाडीवर एक व्यक्ती थंडपेयाची विक्री करतो. या विक्रेत्याने अत्यंत किळसवाणं कृत्य केलं आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोचार रुग्णालयाच्या समोर मृतदेह रुग्णवाहिकेतून एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेताना वापरलेला बर्फ थेट थंडपेयात वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी विक्रेत्याला चोप दिला.
नक्की वाचा - Wardha News : वर्ध्यातील 'या' गावात ग्रामस्थांचं वीज बिल शून्यावर, कशी साधली ही किमया?
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयाच्या बाहेर एका हातगाडीवर सरबत, मठ्ठा, ताक याची विक्री केली जाते. येथील एका हातगाडीवर सरबतात मृतदेहला घेऊन जाणाऱ्या बर्फाचा वापर केल्याचं उघड झालं. हा विक्रेता चक्क रुग्णावहिकेने मृतदेह सोडून आल्यानंतर गटारीत टाकलेल्या बर्फाच्या लाद्या उचलून थेट आपल्या गाड्यावर आणल्या होत्या. शीतपेयं थंड करण्यासाठी असलेल्या थर्माकॉलच्या बॉक्समध्ये हा बर्फ ठेवला होता. किळवाणी बाब म्हणजे या बॉक्सला आणि बर्फाला मोठमोठ्या मुंग्या लागल्या होत्या. शेवटी कोल्हापुरकरांनी या विक्रेत्याला चोप दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world