Mumbai Metro Line 9: दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यानचा मेट्रो मार्ग पूर्णपणे तयार झाला असून हा मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गाची आणखी एक खासियत म्हणजे याच मार्गावर डबल डेकर ब्रीज उभारण्यात आला आहे. वरून मेट्रो आणि खालून गाड्या धावू शकतील अशी या डबल डेकर ब्रीजची रचना आहे. कालपरवापर्यंत या डबल डेकर ब्रीजचं कौतुक केलं जात होतं. मात्र हा ब्रीजही आता पूर्ण झाला असून, या ब्रीजचे फोटो पाहिल्यानंतर 'हा काय प्रकार आहे ?' असा प्रश्न काहींनी विचारण्यास सुरूवात केली आहे.
नक्की वाचा: मुंबईत घ्या स्वप्नातलं घर! मार्चमध्ये म्हाडाकडून 3000 घरांची लॉटरी; लोकेशन काय?
नेमकं झालंय तरी काय?
जेम्स ऑफ मीरा-भाईंदर या X हँडलवर या ब्रीजचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला ब्रीज हा चार पदरी ब्रीज आहे. मात्र पुढे जाऊन हा चारपदरी ब्रीज फक्त दोन पदरांचा करण्यात आला आहे.
A 4-lane flyover in Mira-Bhayandar suddenly narrows into just 2 lanes. This double-decker flyover is a part of the Metro Line 9 project by JKumar and is set to be inaugurated in February.
— Gems of Mira Bhayandar (@GemsOfMBMC) January 26, 2026
Is this how @MMRDAOfficial designs “infrastructure”?
How did this design get approved? 🤷🏻 pic.twitter.com/ZNfwi1Yf9W
MMRDA या पुलाच्या निर्मितीचे काम करत असून लवकरच एमएमआरडीए याबद्दलचा खुलासा करण्याची शक्यता आहे. या ब्रीजसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जर चारपदरी ब्रीज पुढे जाऊन जर दुपदरी होणार असेल तर वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढेल अशी भीती वर्तवण्यात येत आहे.
नक्की वाचा: मेट्रोमध्ये स्टंटबाजी वरूण धवनला पडली महागात! मुंबई मेट्रोचा कडक इशारा
या X पोस्टवर करण्यात आलेल्या काही निवडक कॉमेंट खालीलप्रमाणे आहेत.
This flyover will be shut immediately after inauguration if opened.. As this will be accidental zone.. They will have to make lot of change.. This is worst design who approved it?
— Dakshay Desai (@dakshaydesai) January 26, 2026
Any info which company got tender ?
— 🐺 (@wolfkongzilla) January 27, 2026
Chicken neck !! Brilliant planners and engineers
— Samuel Kumar (@samuelkmk) January 27, 2026
Why are we paying for these shitty ideas? Babus are curse on indian society.
— Surendra Pratap Yadav (@_SurendraP) January 26, 2026
A 4-lane flyover in Mira-Bhayandar suddenly narrows into just 2 lanes. This double-decker flyover is a part of the Metro Line 9 project by JKumar and is set to be inaugurated in February.
— Gems of Mira Bhayandar (@GemsOfMBMC) January 26, 2026
Is this how @MMRDAOfficial designs “infrastructure”?
How did this design get approved? 🤷🏻 pic.twitter.com/ZNfwi1Yf9W
MMRDA ने दिले स्पष्टीकरण
या उड्डाणपुलाच्या रचनेवरून सुरू असलेल्या चर्चेला आता 'एमएमआरडीए'ने (MMRDA) पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उड्डाणपूल अचानक अरुंद झाल्याचा दावा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून, ही रचना उपलब्ध जागेची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनाचा भाग असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांना उत्तर देताना एमएमआरडीएने म्हटले आहे की, उड्डाणपुलाचे 4-Lane मधून 2-Lane मध्ये होणारे रूपांतर ही कोणतीही तांत्रिक चूक नाही. नियोजनानुसार, हा पूल भाईंदर पूर्व आणि भविष्यात भाईंदर पश्चिमला जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सध्या भाईंदर पूर्व दिशेचा मार्ग तयार असल्याने तो 2-Lane दिसतोय. भविष्यात रेल्वे लाईन ओलांडून भाईंदर पश्चिमकडे जाणाऱ्या मार्गासाठी बाहेरील बाजूला आणखी दोन मार्गिका (Lanes) प्रस्तावित आहेत असे एमएमआरडीएने म्हटले आहे.
गोल्डन नेस्ट सर्कल येथील वाहतूक कोंडी सुटणार
गोल्डन नेस्ट सर्कल येथे पाच मुख्य रस्ते एकत्र येतात, जिथे वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी मेट्रोशी एकात्मिक असा 2+2 Lane उड्डाणपूल आणि दोन्ही बाजूंना स्लिप रोड देण्यात आले आहेत, जेणेकरून वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. जंक्शनच्या पुढे, भाईंदर पूर्वकडे जाताना विकास आराखड्यानुसार (DP) रस्त्याची रुंदी कमी होत जाते. त्यामुळेच, रेल्वे फाटक रोडच्या दिशेने विनाअडथळा वाहतूक सुरू राहण्यासाठी मध्यभागात 1+1 Lane चा पूल रॅम्पसह बांधण्यात आला आहे.
भविष्यात विस्तार करण्याचे नियोजन
मिरा-भाईंदर महानगरपालिकेशी (MBMC) समन्वय साधून भविष्यात या पुलाच्या रुंदीकरणाची तरतूद ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी 1+1 Lane वाढवून पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम केली जाणार आहे. हा प्रस्ताव सध्या नियोजनाच्या टप्प्यावर असून सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर याचे काम हाती घेतले जाईल. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्राथमिक उद्देशाने या पुलाची बांधणी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world