काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? काँग्रेसच्या नेत्यानेच नाव न घेता दिली माहिती

Political News : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना काँग्रेसचे चार आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली आहे. नाव न घेता या आमदारांची माहिती देखील कैलास गौरंट्याल यांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान आणि लगेच मतमोजणी होईल. या निवडणुकीत विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहे. मात्र कुणाचे आमदार फुटणार आणि कुणाला त्याचा फायदा होईल, हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. 

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचे चार आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली आहे. नाव न घेता या आमदारांची माहिती देखील कैलास गौरंट्याल यांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या आमदारांच्या फुटीचा फायदा कुणाला होणार हे देखील महत्त्वाचं आहे. 

( नक्की वाचा :  विधानपरिषद निवडणूक : आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर, जयंत पाटील यांनी रेट सांगितला )

कैलास गोरंट्याल काय म्हणाले?

कैलास गोरंट्याल यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला याबाबत बोलताना असं म्हटलं की, पक्षाचे 3-4 आमदार डाऊटफुल आहेत. आमच्या नेत्यांनाही ते माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहेत. याची पूर्वकल्पना असल्याने त्याबाबत व्यवस्था आम्ही करणार आहोत. आम्हाला किंवा आमच्या मित्रांना याचा दगाफटका होणार नाही याची रणनिती आम्ही आखणार आहोत.

(नक्की वाचा : विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार? )

मी कोणाचंही नाव घेणार नाही. फक्त इशारा करेन. ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला. एक टोपीवाला आहे. आंध्र-नांदेड बॉर्डरवरचा एक आहे, हे चार डाऊटफूल आहेत, असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.  

Advertisement

कोणते उमेदवार रिंगणात?

विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे.  

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर