जाहिरात

विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार?

Vidhanparishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी नवी खेळी केली आहे.

विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार?
मुंबई:

Vidhanparishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आमदारांची घसरलेली संख्या तसंच बदलेली समीकरणं यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यातच आगामी विधानसभेपूर्वी होणारी ही शेवटची निवडणूक असल्यानं दोन्ही आघाडीकडून आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शरद पवारांची नवी खेळी

शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिलाय. जयंत पाटील यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवारांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यातला बहुजन विकास आघाडी हा महत्त्वाचा पक्ष आहे. या पक्षाचे तीन आमदार आहेत. सध्या त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे. पण,पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट सामना झाला होता. त्यामध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि ठाकूर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. पवारांच्या भेटीनंतर ठाकूर काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

( नक्की वाचा :विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण )
 

राष्ट्रवादी काँग्रेसची जय्यत तयारी

विधान परिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही जय्यत तयारी सुरु केलीय. निवडणुकीच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर या पक्षाकडं हक्काची 43 मतं आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी 3 मतांची आवश्यकता आहे. 


विधानपरिषद निवडणुकीत कोणते उमेदवार रिंगणात?

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
अजित पवारांना आणखी एक झटका लागणार? बडा नेता घर वापसीच्या तयारीत
विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार?
BJP leader ashish deshmukh on sunil kedar and dhananjay munde political news
Next Article
महायुतीत पुन्हा धुसफूस; भाजप नेत्याचा राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांवर निशाणा