'जय महाराष्ट्र, जय एकनाथ'; विधान परिषद शपथविधी सोहळ्यादरम्यान कोणी केली ही घोषणा?

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणुकीत विजयी झालेल्या 11 विधान परिषद सदस्यांना विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी आज शपथ दिली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणुकीत विजयी झालेल्या 11 विधान परिषद सदस्यांना विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी आज शपथ दिली. विधान भवनाच्या केंद्रीय कक्षात आज त्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी लोकसभा निवडणूक संधी न दिलेल्या शिंदेंच्या शिवसेना गटाच्या भावना गवळी यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. आज शपथविधीवेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र, जय एकनाथ म्हटलं आहे. 

भावना गवळी यांचं तिकीट कापलं..
पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी या यंदाही यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी इच्छुक होत्या. शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली. यावेळी त्यांनाच तिकीट मिळेल असा अंदाज होता. मात्र महायुती असल्याकारणाने त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्याजागी हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं होतं. याशिवाय आज शपथविधीदरम्यान आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेबांना नमन करून शपथविधीला सुरुवात केली. 

नक्की वाचा - NITI Aayog Meeting : कोकणाचे पाणी वापरून मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपवण्याबाबत चर्चा

कोणत्या आमदारांनी घेतली शपथ?

1- पंकजा मुंडे - भाजप

2- योगेश टिळेकर - भाजप

3- अमित गोरखे - भाजप

4- परिणय फुके - भाजप

5- सदाभाऊ खोत- भाजप

6- भावना गवळी - शिंदे शिवसेना 

7- कृपाल तुमाने - शिंदे शिवसेना 

8- शिवाजी गरजे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

9- राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

10- प्रज्ञा सातव - काँग्रेस 

11- मिलिंद नार्वेकर - उद्धव ठाकरे पार्टी