राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
लोकसभेला मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला झाले. म्हणून आता या आकडेवारीच्या आधारे मुस्लिमांतील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील 288 पैकी 38 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम समाजाची ताकद किती मोठी आहे याची आकडेवारी देत या जागांवर काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीने दावा केला आहे.
मुंबईतील नऊ मतदारसंघांसह राज्यातील एकूण 38 विधानसभा मतदारसंघांमधील मुस्लीम मतांची आकडेवारी गोळा करून यासंदर्भातील अहवाल महाविकास आघाडीला पाठवण्यात आला आहे. संभाव्य जागावाटपात 38 जागा ज्या पक्षाला जातील त्यांच्या कोट्यांमधून मुस्लीम उमेदवाराला स्थान दिले जावे अशी मागणी आहे. अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी ही माहिती दिली. त्यामुळे मविआवर दबाव वाढला आहे.
नक्की वाचा - मुंबईमध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण? शिंदेंची सेना की भाजप? राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा?
मविआच्या नेते काय करत आहेत?
मुस्लीम मतांचा प्राप्त डाटा पडताळणी मविआने सुरू केली आहे. खरोखरच दिलेल्या आकडेवारीनुसार मतदारसंघांमध्ये कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे व संभाव्य उमेदवार निवडताना सुवर्ण मध्य कसा साधायचा यासाठी मविआचे वरिष्ठ नेते विचार करत असल्याचे सांगितले जाते.
शौकत पठाण, प्रदेश उपाध्य अल्पसंख्याक सेल (मुस्लीम समुदायाची सोलापुरात बैठक झाली. 500 हून अधिक लोक उपस्थित होते. जर आम्हाला सोलापूरमध्ये तिकीट नाही दिलं तर आम्ही भाजपाकडे पण जाऊ. हे आम्ही नाना पटोले यांना कळवले आहे. आमची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष मुस्लिमांच्या मताचा वापर करतो. तिकीट मात्र देत नाही जर भाजपने आम्हाला राजकीय संधी दिली तर भाजप सुद्धा मला वर्जित नाही.
हमखास निवडून येण्याचा दावा असलेले मतदारसंघ व तेथील मुस्लीम मतदार
मतदारसंघ मुस्लीम मतदार
भिवंडी पूर्व 1,36,638
भिवंडी पश्चिम 1,44,580
मानखुर्द 1,57,518
वसई 1,57,518
मुंबादेवी 1,26,644
वांद्रे 1,25,119
भायखळा 80,432
मालेगाव मध्य 1,05,200
अमरावती 2,23,368
अकोला पश्चिम 1,63,204
धारावी 1,48,008
अकोट 85,609
औरंगाबाद मध्य 1,10,529
धुळे शहर 1,23,434
सोलापूर मध्य 1,66,672
कल्याण 73,662
कलिना 1,43,765
नांदेड उत्तर 67,358
पुणे कॅन्टोन्मेंट 58,509
अमरावती 1,95,673
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world