मनोज जरांगे फॅक्टर का ठरला फ्लॉप? महायुतीची खेळी पडली भारी; वाचा 5 महत्वाचे मुद्दे

लोकसभेला सर्वात मोठा फॅक्टर ठरलेल्या मनोज जरांगेंची जादू मात्र विधानसभा निवडणुकीत चालली नाही. उलट विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक जागा या महायुतीने जिंकल्या.

जाहिरात
Read Time: 3 mins

राज्याचा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीने अभुतपूर्व असा विजय संपादन केला. या निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षही राहणार नाही, इतका दारुण पराभव महाविकास आघाडीचा झाला.  महायुतीने जवळपास २३० जागांवर विजय मिळवला तर महायुतीला अवघ्या ४६ जागा जिंकता आल्या.महत्वाचं म्हणजे लोकसभेला सर्वात मोठा फॅक्टर ठरलेल्या मनोज जरांगेंची जादू मात्र विधानसभा निवडणुकीत चालली नाही. उलट विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक जागा या महायुतीने जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर का फ्लॉप ठरला? जाणून घ्या सविस्तर... 

1. मनोज जरांगेंची शेवटपर्यंतची संभ्रमी भूमिका...
विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली होती. मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक मतदारसंघात आपले उमेदवार उतरवतील असेही मानले जात होते. मात्र मनोज जरांगेंनी याबाबत शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ते  वारंवार भूमिका बदलत राहिले, ज्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचे दिसले.

2. स्पष्ट संकेत देण्यात अपयश
मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेचा रोख महायुतीसह महाविकास आघाडीवरही कायम होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल मतदारांमध्ये संभ्रम राहिला. त्यांनी भलेही सगळ्यांना पाडा, सरसकट पाडा असे आदेश दिले होते. मात्र तरीही त्यांनी नेमके कोणाच्या बाजूने राहा किंवा कुणाला पाडा याबाबत आपली थेट भूमिका जाहीर केली नव्हती. यावरुनही मराठा बांधवांची गोंधळाची भूमिका राहीली. त्यामुळेही जरांगे फॅक्टर फेल ठरला.

नक्की वाचा: महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली

3. महायुतीची हुशारी
मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या आव्हानानंतरही महायुतीने उमेदवारी देताना दाखवलेली हुशारी महत्वाची ठरली. भाजपसह महायुतीमधील घटक पक्षांनी मराठवाड्यात बहुतांश उमेदवार हे मराठा असतील याची काळजी घेतली. मराठा उमेदवार समोर असल्याने कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न मराठा बांधवांसमोर होता. तसेच लाडकी बहीणचाही महायुतीने जोरदार प्रचार केला. स्थानिक मुद्दे हेरुन त्यावर लक्षकेंद्रित करण्याचे काम केले.ज्याचा प्रचंड मोठा फायदा महायुतीला झाला. 

Advertisement

4. मराठा- ओबीसी वाद अन् मतांचे ध्रुवीकरण 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर त्याला ओबीसी बांधवांचाही प्रतिसाद, पाठिंबा मिळाला. मात्र त्यानंतर त्यांनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली त्यामुळे ओबीसी- मराठा वाद सुरु झाला. जरांगेंच्या या ओबीसी विरुद्ध भूमिकेमुळे नवा संघर्ष उभा राहिला. एकीकडे लक्ष्मण हाके आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील असा सामना रंगला. त्यामुळेच ओबीसी मतांचा कल महायुतीकडे वळला आणि एकगठ्ठा युतीला मतदान झाले. ज्याचा फटका मविआला बसला. 

महत्वाची बातमी: बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय घडलं? महायुतीने लोकसभेतून कसा घेतला धडा?

5. महायुतीसह फडणवीसांवर टीका

मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यापासून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा रोख धरला होता.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी टिका मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरच केली, त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे विरोधकांना मदत करत
आहेत असा संदेश गेला. तसेच त्यांची ओबीसींमधून आरक्षणाची मागणी असल्याने ओबीसी बांधव एकवटले. दुसरीकडे विरोधकांनीही
सरकारविरोधात केलेला प्रचार त्यांच्यावरच उलटला आणि महायुतीला अप्रत्यक्षपणे बळ मिळाले. 

Advertisement